चक्रीवादळ बिपरजॉयमुळे हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. वादळाचा प्रभाव गुजरातच्या किनारपट्टीच्या कच्छवर तसेच महाराष्ट्रातील अनेक किनाऱ्यांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. या चक्रीवादळामुळे कोणतीही हानी होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज व सतर्क आहे. चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने सोमवारी (12 जून) 67 गाड्या रद्द केल्या आणि 13 जून ते 15 जून या कालावधीत 95 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. रेल्वेने आज रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती दिली आहे. यासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही बिजपरजॉय संदर्भात अलर्ट देण्यात आला आहे. (हेही वाचा: चक्रीवादळ बिपरजॉयमुळे समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; गणपतीपुळे येथे किनाऱ्यावरील पर्यटकांना तडाखा Watch
67 trains have been cancelled, in view of cyclone 'Biparjoy' says CPRO Western Railway. pic.twitter.com/Pe44DJgdqn
— ANI (@ANI) June 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)