चक्रीवादळ 'बिपरजॉय' आता तीव्र झाले आहे. लवकरच ते सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवरील मांडवी-जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आसपासच्या किनारी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या सगळ्यामध्ये चक्रीवादळाचे अनेक भयानक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गणपतीपुळे येथील एका व्हिडीओ समुद्राच्या महाकाय लाटा पर्यटकांवर आदळताना दिसत आहेत. रविवारी चक्रीवादळाच्या मोठ्या लाटेत जवळपास सुमारे 50 पेक्षा जास्त पर्यटक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी आलेल्या या मोठ्या लाटेने किनाऱ्यावरील अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. (हेही वाचा: Cyclone Biparjoy दरम्यान मुंबईच्या जुहू बीचवर सहा जण समुद्रात बुडाले; दोघांची सुटका, चार बेपत्ता, बचावकार्य सुरू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)