Severe Rainfall Alert: महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा; पहा रायगड, दक्षिण कोकण, मुंबई चा हवामान अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या महाराष्ट्राच्या किनारपट्टी जवळ मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार आज 23 मे आणि उद्या 24 मे दिवशी महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. असेही नमूद करण्यात आले आहे. नक्की वाचा: Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची शक्यता; IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या Real-Time Status .
महाराष्ट्रातील हवामान अंदाज
विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस, मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/O7WGEKAGmW
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 23, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

