Telangana Express Catches Fire: तेलंगना एक्सप्रेस रेल्वेला आग, दोन डबे आगीच्या भक्षस्थानी
Telangana Express Catches Fire in Haryana | (Photo Credits: ANI)

Telangana Express Catches Fire: तेलंगना राज्यातून दिल्ली शहराच्या दिशेने निघालेल्या तेलंगाना एक्सप्रेस (Telangana Express)  या गाडीला अचानक आग लागली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी 7.45 वाजनेच्या सुमारास  बल्लभगढ ते असावटी स्टेशन दरम्यान घडली. घटनेची माहिती कळताच रेल्वेसेवेतील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली या कारणाचाही शोध घेतला जात आहे.

तेलंगाना एक्सप्रेस या गाडीच्या नवव्या डब्याखालून धुराचे लोट निघू लागले. त्यानंतर गाडीच्या काही डब्यांना आग लागल्याचे पुढे आले. या घटनेमुळे गाडी रुळावरच तत्काळ थांबविण्यात आली. आग (Fire Broke out)  लागल्याच्या घटनेमुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली.

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त तेलंगाना एक्सप्रेस सध्या बल्लभगढ ते असावटी या स्टेशनदरम्यान असलेल्या रेल्वेमार्गावर उभी करण्या आली आहे. तसेच, या दुर्घटनेमुळे दिल्ली-झांसी रेल्वेमार्गावरील रेल्वेंचा प्रवास स्थगित करण्यात आल्या आहेत.  (हेही वाचा, रेल्वे अपघात टाळण्यासाठी चर्चगेट स्थानकात नवे बफर्स; कसे काम करणार हे बफर्स?)

एएनआय ट्विट

प्राप्त माहितीनुसार तेलंगना एक्सप्रेस या गाडीतील सर्व प्रवाशी सुरक्षीत असून, कोणत्याही जीवीत हानीचे वृत्त नाही. उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार यांनी सांगितले की, साधारण सकाळी 7.43 वाजनेच्या दरम्यान एक्सप्रेसमधील 2 डब्यांना आग लागली. आग लागलेले दोन्ही डबे गाडीपासून वेगळे कररण्यात आले आहेत. तसेच, आगीवर नियंत्रणही मिळवले आहे.