Effective Buffers at PF 3 at Churchgate (Photo Credit: Western Railway/Twitter)

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने एक नवे पाऊल उचलले आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे किंवा स्थानकांवरील त्रुटींमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर अत्याधुनिक सुविधा सुरु केल्या आहेत. त्यात कार्यक्षम आणि प्रभावी बफर्सचा समावेश आहे. या बफर्समुळे ब्रेक फेल झाल्याने धावणारी ट्रेन थांबवणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना निर्माण होणाऱ्या धोक्याची तीव्रता कमी होईल आणि सुरक्षिततेत भर पडेल.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन विकसित बफर्स शॉक शोबिंगच्या हायड्रो न्यूमॅटिक टेक्निकवर आधारित आहेत. याची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता 1254 KJ असून 5 किमी प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन थांबवण्याची यात क्षमता आहे. या बफर्सची खासियत म्हणजे गरजेनुसार याची वैशिष्ट्ये (मदत करण्याची पद्धत/क्षमता) बदलते. (2-3 फेब्रुवारीला पश्चिम रेल्वे मार्गावर 11 तासांचा मेगाब्लॉक; लोअर परळ उड्डाणपुलाच्या कामामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द)

या बफर्सची निर्मिती आणि परिक्षण एलईओ आंतरराष्ट्रीय कॉव्हेन्ट्री, इंग्लंड (युनायटेड किंगडम) येथे करण्यात आले आहे. या बफर्सचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याची 24 महिन्यांची वॉरंटी असून यांना देखभालीची आवश्यकता भासत नाही.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत एकूण 43 डेट एंड बफर्स आहेत. त्यापैकी 38 कन्वेशनल बफर्स आहेत. उरलेले 5 हायड्रॉलिक बफर आहेत. चर्चगेट स्टेशनवरील नव्या बफर्सच्या यशस्वी कार्यामुळे आता 42 नवे बफर्स लावण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे.

जून 2015 मध्ये, चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर बफरसह स्थानिक रेल्वे डॅश झाली होती. तेव्हा झालेले नुकसान पीएल शॉप ऑनसाइटद्वारे तात्पुरते दुरुस्त केले गेले होते. परंतु, बफर्स बदलण्याची आवश्यकता होती. त्यामुळे भारतीय रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.