Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर भारत सरकारने 24 औषधांच्या निर्यातीवरील निर्बंधे हटवली; कोरोनाशी लढण्यासाठी गरजू देशांना मदत करण्याचे आश्वासन
Donald Trump| Photo Credits: Twitter

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सर्वात मोठा फटका बसलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत सरकारला इशारा देत कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन (Hydroxychloroquine)  चा पुरवठा करण्याची मागणी केली होती. केवळ मागणीच नव्हे तर भारताने औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर अमेरिका या विरोधात कारवाई करेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता, यानंतर आता भारत सरकारने कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन सहित अन्य 24 औषधांवरील निर्बंध हटवले आहेत सोबतच ज्या देशांना गरज असेल त्यांना मदत करू असे आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे, याविषयी परराष्ट्र मंत्रालयाने खास पत्रक जारी करून माहिती दिली. मात्र पॅरासीटेमोल औषधांच्या निर्यतीवर निर्बंध कायम आहेत.

प्राप्त माहितीनुसार, हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाची सर्वाधिक निर्मिती ही भारतात होते मात्र भारतात कोरोनाची चाहूल लागताच औषधांची कमी पडू नये यासाठी परसिटॉमाल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन सहित काही औषधांच्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र ज्या देशांना कोरोनाचा सर्वात अधिक फटका बसला आहे आणि हे देश औषधांच्या पुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून आहेत त्यांना औषधे देण्यासाठी हा निर्णय मानवतेच्या मुद्द्यावरून घेतला गेला आहे असे सांगण्यात आले आहे, तरीही यामागे अमेरिकेचा दबाव असू शकते हे स्पष्ट दिसून येतेय.

ANI ट्विट

Coronavirus: भारताने सर्व राष्ट्रांना मदत करावी, मात्र प्राण वाचवणारी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत; राहुल गांधी

दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत 3 लाख 67 हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनामुळे मृत्यूचा आकडा 10 हजार 871 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात तुलनेने परिस्थिती हातात आहे पण तरीही कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज घडीला भारतात 4421 कोरोनाचे रुग्ण आहेत.