गंगा नदी (Photo Credit :Instagram

कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन (Coronavirus Lock Down) लागू करण्यात आले आहे, परिणामी सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत, रहदारी बंद झाली असून प्राणी पक्षी मुक्त संचार करताना रस्त्यात दिसून येत आहेत. लोक नसल्याने पर्यावरणाला बराच फायदा होत मागील कित्येक दिवसात दिसून आले आहे. असाच फायदा भारतातील पवित्र नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगेला झाला आहे, मागील काही वर्षांपासून ज्या गंगा नदीला प्रदूषणामुळे ओळखता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच गंगेच्या पाण्यात (Ganga River Water) आता 40 ते 50 टक्के सुधारणा झाली आहे. काही दिवसांपासून गंगेच्या नदी किनारी असणारे कारखाने आणि कंपन्या बंद असल्याने प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे परिणामी गंगेच्या पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लॉक डाऊन काळात इंडस्ट्री बंद आहेत त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न बाजूला झाला आहे. साहजिकच या वेळात जलशुद्धीकरणाला चांगला वेळ मिळत आहे. असाच प्रकार गंगेच्या बाबत सुद्धा घडला आहे. नुकतीच कानपूरमध्ये गंगेच्या पाण्याची चाचणी करण्यात आल्यावर त्यात ४० ते ५० टक्के गुणवंता सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. ANI या वृत्तसंस्थेने या सुधारित गंगेच्या पाण्याचा एक व्हिडीओ सुद्धा पोस्ट केला आहे. Bombay High येथील समुद्री भागात आढळले Whales! नेटिझन्सना भुरळ पाडणारा हा व्हिडिओ खरा आहे का? (Watch Video)

ANI ट्विट

दरम्यान, गंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा हा कित्येक वर्षांपासून ज्वलंत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खास मंत्रालय सुद्धा सुरु केलं आहे. या मंत्रालयाने सुद्धा वेळोवेळी गंगेच्या पात्रात जाणार एक दशांश दूषित पाणी आजूबाजूच्या कंपन्या आणि कारखान्यातील आहे असे सांगितले होते, पण साहजिकच हे कारखाने बंद करण्याचा पर्याय नसल्याने गंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न काही केल्या सुटत नव्हता. आता मात्र लॉक डाऊन मुळे अनायसे सर्व कारखाने बंद असल्याने जलशुद्धीकरण होऊन गंगेच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे.