Bombay High येथील समुद्री भागात आढळले Whales! नेटिझन्सना भुरळ पाडणारा हा व्हिडिओ खरा आहे का? (Watch Video)
Whale video (Photo Credits: Video Grab)

मुंबई-समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 176 कि.मी. अंतरावर असलेल्या बॉम्बे हाय (Bombay High) येथे व्हेल (Whales) मासे आढळल्याचा दावा केला जात आहे. तसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांना या अद्भुत दृश्याने भुरळ पडली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना मुळे लॉक डाऊन (Cornavirus Lock Down) सुरु असताना पृथ्वीवर प्रदूषण कमी होत आहे, प्राणी पक्षी आता मनसोक्त जगू शकत आहेत, पर्यावरणाची परिस्थिती बदलत आहे अशा धाटणीचे कॅप्शन्स देऊन नेटकरी हा व्हेल माशांचा व्हिडीओ शेअर करत आहेत. नेटकाऱ्यानी हे व्हेल हम्पबॅक व्हेल आहेत असा दावा केला आहे मात्र असे प्राणी सहसा बॉम्बे हाय सारख्या भागात आढळत नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ दुसऱ्या कोणत्यातरी ठिकाणचा असण्याची दाट शक्यता आहे. तसेच ओएनजीसीच्या (ONGC) निवेदनानुसार हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. (हेही वाचा: Fact Check: इटलीमध्ये COVID-19 च्या पार्श्वभूमीवर चर्चवर दिसला धडकी भरवणारा पक्षी, जाणून घ्या या बनावट व्हायरल व्हिडिओचे सत्य)

व्हिडीओ मध्ये दिसून येत असल्याप्रमाणे, बॉम्बे हाय येथील ओएनजीसी तेल क्षेत्राजवळील निळ्याशार पाण्यात तीन व्हेल मनसोक्त तरंगण्याचा आनंद घेत आहेत. वास्स्तविक हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असला तरी त्यांच्या सत्यतेबाबत संशय आहे कारण ज्या भागात हा व्हिडीओ काढण्यात आला तिथे अधिकृतरीत्या कॅमेरा नेण्याची परवानगी नाही. तसेच यापूर्वीही काही वेळा असे खोटे व्हिडीओ व्हायरल झाले होते मात्र आता व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून त्याच्या स्रोताविषयी लोक चिंता करत नसून या Rare दृश्याचा आनंद घेत आहेत.

पहा व्हिडीओ

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे सुद्धा डॉल्फिन्सचे दर्शन झाले होते. त्यानंतर साऊथ मुंबई मधील बाबुलनाथ परिसरात रस्त्यावर मोरही आढळले होते. सध्या कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉक डाऊन आहे. अशावेळी शहरांतील रस्ते ओस पडले आहेत, रस्त्यावर वाहने नाहीत का लोक नाहीत, त्यामुळे हे प्राणी पक्षी मनसोक्त फिरताना दिसून येत आहेत.