इटली चर्च प्रती विचित्र पक्षी (Photo Credits: Video Grab)

कोरोना व्हायरस (Coronavirus) इटलीमध्ये (Italy) मृत्यूचे तांडव करत आहे. कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये दररोज लोकं आपले प्राण गमवावे लागत आहे. कोविड-19 (COVID-19) च्या कहर दरम्यान इटलीमध्ये विचित्र आणि भितीदायक पक्ष्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक विचित्र पंख असलेला पक्षी दिसतो, ज्याने इटलीमधील चर्चचे छत काबीज केले आहे. हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ पाहणार्‍या लोकांना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावादरम्यान त्यांना जगामध्ये असलेल्या विचित्र गोष्टींबद्दल विचार करण्यास भाग पाडले आहे. मात्र, आपण हा व्हिडिओ सत्य म्हणून स्वीकारण्यापूर्वी आणि मत बनविण्यापूर्वी आम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ बनावट आहे. सध्याची स्थिती पाहता सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहे, त्यामुळे त्याची सत्यता जाणून घेण्यापूर्वी कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नये. (Fact Check: कोरोनाच्या भीतीने बेल्जीयम मध्ये Group Sex वर सक्तीची बंदी? जाणून घ्या सत्य)

हा विचित्र पक्षी प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, उलट तो स्पेशल इफेक्टने तयार केला गेला आहे. या व्हिडिओप्रमाणेच चीनच्या आकाशात एक ड्रॅगनसारखा दिसणारा एक विचित्र प्राणी दिसणारा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओही स्पेशल इफेक्टने तयार केला गेला आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बरेच बनावटी व्हिडिओ शेअर केले जात आहेत आणि इटलीच्या चर्चवर बसलेल्या या विचित्र पक्ष्याचा व्हिडिओदेखील त्या बनावट व्हिडिओंपैकी एक आहे.

सोशल मीडियावर एक 45 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यामध्ये एक विचित्र पक्षी कॅटरॅडल डी ग्रॅनाडा वर चढताना दिसत आहे. हा व्हिडिओ ख्रिश्चन धर्मावरचा हल्ला असल्याचे सांगून काही लोकं हा व्हिडिओ शेअर करत आहेत. लोक सोशल मीडियावर या पक्ष्याला विचित्र आणि भितीदायक म्हणत आहेत, परंतु हा व्हिडिओ बनावट आहे. हा व्हिडिओ जून 2019 चा असून जेजेपीडी प्रॉडक्शनने यूट्यूबवर अपलोड केला होता. या चॅनेलचे निर्माते असे व्हिडिओ तयार करण्यात पटाईत आहेत आणि त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्पेशल इफेक्टद्वारे विचित्र दिसणारी प्राणी तयार करणे आहे.

आपण त्यांच्या चॅनेलवर अन्य व्हिडिओ तपासल्यास आपण त्यांकडे असे व्हिडिओ खूप असल्याचे दिसून येते. हे चॅनेल निकाराग्वाच्या दोन भावांनी बनविले आहे. या चॅनेलच्या वर्णनात असे म्हटले आहे की ते स्पेशल इफेक्ट व्हिडिओ बनविण्यात तज्ज्ञ आहे.