Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने लहान मुलांवर कोवॅक्सिनचे ट्रायल वेगाने केले जात आहे. अशातच एम्स येथे ट्रायलमध्ये सहभागी होणाऱ्या 6-12 वयोगटातील मुलांना सुद्धा लसीचा दुसरा डोस दिला गेला आहे. पुढील आठवड्यात 2-6 वयोगटातील मुलांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तेव्हाच ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलांना लसीचा दुसरा डोस दिल्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या संदर्भातील रिपोर्ट पुढील महिन्याच्या अखेर पर्यंत येऊ शकतात अशी अपेक्षा आहे. त्यामुळे स्पष्ट होते की, लसीकरण मुलांसाठी किती सुरक्षित आहे.(Tourist Guidelines: जाणून घ्या कोरोनामुळे कोणकोणत्या राज्यांनी पर्यटकांवर लावले आहेत निर्बंध ?)

आतापर्यंत ट्रायलमध्ये लसीमुळे कोणताही दुष्परिणाम झाल्याचे समोर आलेले नाही. उल्लेखनीय आहे की, देशातील सहा रुग्णालयांमध्ये 525 मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. त्याअंतर्गत मुलांना वयानुसार तीन वर्गात विभागण्यात आले असून त्यांच्यावर ट्रायल केले जात आहे. ट्रायलसाठी प्रत्येक गटात 175 मुलांची निवड करण्यात आली आहे. 2-6 वयोगटातील मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. आता फक्त त्यांना दुसरा डोस देणे शिल्लक आहे.(India COVID19 Cases Update: देशात कोरोनाचे आणखी 41,157 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 518 जणांचा बळी)

जायडस कॅडिलाची लस संदर्भात केंद्र सरकारकडून दिल्ली हायकोर्टाला मुख्य माहिती दिली गेली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की, 12-18 वयोगटातील ट्रायल पू्र्ण होण्याच्या मार्गावर आहे. तर दिल्ली हायकोर्टाने असे म्हटले की, कोवॅक्सिनचे ट्रायल पू्र्ण होऊ द्या. तसेच संपूर्ण ट्रायलशिवाय मुलांना लस दिली गेल्यास त्यापासून मोठा धोका उद्भवू शकतो. तर ही लस 12-18 वयोगटातील मुलांना दिली जाणार आहे.