Coronavirus Vaccine: कोरोनावरील लसीचे डोस जानेवारी महिन्यापासून देण्यास सुरुवात केली जाईल, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे संकेत
Dr Harsh Vardhan (Photo Credits: ANI)

Coronavirus Vaccine:  कोरोना व्हायससवर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान आता आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे. हर्षवर्धन यांनी असे म्हटले आहे की, देशात लसीकरण जानेवारी पासुन सुरु करण्याची शक्यता आहे. तर पुढे त्यांनी असे ही म्हटले की, व्यतिक्त मला असे वाटते की जानेवारी महिन्यात कोणत्याही वेळी आम्ही देशातील जनतेला लस देण्याच्या स्थितीत असू. कोविड19 चे लसीकरण आणि त्यांच्या चाचण्यांबद्दल देशात पाठी नाही आहे. लस ही सुरक्षित आणि प्रभावी ठरेल ही आमची प्राथमिकता असणार आहे. या प्रकरणी कोणतीच तडजोड केली जाणार नाही.

याआधी कोविड10 वर मंत्रीमंडळाची 22 वी बैठक पार पडली होती. त्यामध्ये हर्षवर्धन यांनी असे म्हटले होते की, सहा-सात महिन्यात जवळपास 30 कोटी लोकांना लस देण्यास आम्ही सक्षम असू. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एका पत्रकार परिषदेत असे म्हटले होते की, सहा लसी क्लिनिकल ट्रायल स्टेजमध्ये आहे. तीन लस या प्री-क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. काही आठवड्यात यामधील काहींना परवाना मिळू शकतो. पण लस दिल्यानंतर ही नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियम पाळावे लागणार आहेत.(Shigella: शिगेला बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; उत्तर केरळमध्ये हाय अलर्ट)

Tweet:

दुसऱ्या बाजूला WHO चे महानिर्देशक टॅड्रॉस अॅडहेनॉम घेबरेयेसस यांनी असे म्हटले की, या महारोगावरील लस कॉवॅक्सचे जवळजवळ 3 लाख अरब डोस खरेदी करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. संघटनेचे उद्देश ही लस गरजू देशांमध्ये एकसमान पद्धतीने उपलब्ध करुन द्यावी. तसेच मार्च 2021 पर्यंत ही उपलब्ध करुन दिली जाईल असा विश्वास डब्लूएचओ यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.