Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus Vaccination: देशभरात आजपासून कोरोनाच्या लसीकरण अभियानातील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यानुसार जेष्ठ नागरिक आणि वैद्यकिय आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. लसीकरण अभियानाची सुरुवात आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झाली आहे. त्यामुळे या कॅटेगरीत येणाऱ्या नागरिकांना Co-Win अॅपवर रजिस्टर करता येणार आहे. त्यानुसार त्यांना आपल्या जवळचे वॅक्सीनेशन सेंटर सुद्धा निवडता येणार आहे. सर्वांना 28 दिवसांच्या कालावधीत लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत.

जर तुम्हाला सु्द्धा रजिस्ट्रेशन करायचे असल्यास त्यासाठी Registration Of The Vaccination पेजवर जावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक फोटो आयडी प्रुफ निवडावा लागणार आहे. आयडी क्रमांक टाकल्यानंतर तेथे लिंग, जन्मतारीख द्यावी लागणार आहे. आता तुम्हाला Yes किंवा No हा ऑप्शन दाखवला जाणार असून अखेर तुम्ही रजिस्टर बटणावर क्लिक करु शकता.(COVID-19 Vaccine: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस; जनतेला केलं लस घेण्याचं आवाहन)

>>Co-Win App वर या स्टेप्स फॉलो करुन करा रजिस्ट्रेशन

-सर्वात प्रथम तुम्हाला www.cowin.gov.in वर भेट द्यावी लागणार आहे.

-त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक दिल्यानंतर एक ओटीपी तुम्हाला येईल.

-ओटीपी आल्यानंतर तो द्यावा लागणार आहे.

-ओटीपी दिल्यानंतर वेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करावे.

दरम्यान, कोरोनाच्या लसीसाठी शासकीय रुग्णालये किंवा केंद्रात नागरिकांना मोफत डोस दिले जाणार आहेत. परंतु खासगी रुग्णालयात 1 डोससाठी 250 ते 150 रुपये असणार आहे. खासगी रुग्णालयांना या किंमती नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी कडून दिल्या गेल्या आहेत.

त्याचसोबत नागरिकांना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर 3 जणांना सुद्धा तेथे रजिस्टर करता येणार आहे. तसेच आपल्या सोयीनुसार लसीकरणाचे सेंटर निवडावे. लसीकरण तुम्हाला कोणत्या दिवशी करायचे आहे त्याची तारीख निवडावी पण त्यासाठी तुम्हाला एक स्लॉट दिला जाईल. त्याचसोबत तुम्ही लसीकरणाची तारीख शेड्युल सुद्धा करु शकतात.