कोरोना व्हायरसचे देशात सध्या 246 रुग्ण असून यांची संख्या अजून वाढू नये म्हणून सरकारकडून खबरदारीची पाऊल उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान नागरिकांना घरबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने देखील अनेक एक्सप्रेस रेल्वे रद्द केल्या आहेत. तसंच मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. (मुंबई: कोरोनाच्या भीतीमुळे मूळ गावी परतण्यासाठी नागरिकांची रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी)
21 मार्च रात्री 11 वाजल्यापासून 22 मार्च पर्यंत पॅसेंजर ट्रेन बंद राहणार आहे. तर मेल, एक्सप्रेस आणि इंटरसिटी 22 मार्च रोजी पहाटे 4 ते रात्री 10 या काळात बंद राहतील. तसंच जनता कर्फ्यूच्या काळात 12 ट्रेन्सच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच पश्चिम रेल्वेच्या काही उपनगरीय सेवा देखील बंद असतील. विरार-डहाणू साठी 11.55 आणि 3.45 वाजता सुटणारी ट्रेन तसंच डहाणू रोड ते दादर साठी जाणारी 3.45 वाजता सुटणारी ट्रेन आणि डहाणू रोड हून चर्चगेट साठी जाणारी 7.00 वाजताची ट्रेन रद्द करण्चा आली आहे.
Western Railway Tweet:
पश्चिम रेलवे द्वारा 22 मार्च, 2020 को 07.00 बजे से 21.00 बजे तक #coronavirus से सावधानी बतौर देशव्यापी जनता कर्फ्यू के मद्देनज़र 12 और ट्रेनों के फेरे रद्द करने का निर्णय लिया गया है। इसी प्रकार 22 मार्च, 2020 को पश्चिम रेलवे की कुछ उपनगरीय सेवाएँ भी रद्द रहेंगी। #WRUpdates pic.twitter.com/EI9vkWbNDd
— Western Railway (@WesternRly) March 20, 2020
कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत असल्यामुळे धोका टाळण्यासाठी सरकारने काही निर्बंध घातले आहेत. मात्र ते हितावह आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, ऑफिसेस, वर्कशॉप्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.