Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

चीनच्या वुहान शहरातून परसरुन संपूर्ण जगला जेरीस आणलेल्या कोरोना व्हायरसची व्याप्ती भारतातही वाढू लागली आहे. भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या 52,952 वर पोहचली आहे. त्यापैकी 15,266 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 35,902 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 1783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान 15000 हून अधिक रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून ही बाब अत्यंत दिलासादायक आहे.

देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यात लक्षणीय रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकूण 16758 कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 3094 रुग्ण कोरोना संसर्गातून रिकव्हर झाले आहेत. तर 651 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. (Coronavirus Update: महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात गेल्या दोन दिवसात 700 रुग्ण कोरोनामुक्त)

ANI Tweet:

दरम्यान लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला असून या कालावधीत अनेक उपाययोजना राबवून कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान आज बुद्धपौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. "एकमेकांना शक्य तितकी मदत करा. एकजुटीने आपण या संकटावर मात करुया," असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी देशवासियांना दिला.