Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाशी देश मागील 4-5 महिने लढत आहे. दिवसागणित कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. मागील 24 तासांत 78,357 नवे कोरोना बाधित आढळून आले असून 1045 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 37,69,524 वर पोहचला आहे. तर एकूण 66,333 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 8,01,282 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 29,019,09 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health and Family Welfare) देण्यात आली आहे.

कोविड-19 वर ठोस औषध किंवा लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे टेस्ट, ट्रॅस आणि ट्रिट या त्रिसुत्रीच्या आधारे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. दरम्यान देशात आतापर्यंत कोविड-19 च्या 4,43,37,201 चाचण्या पार पडल्या आहेत. त्यापैकी 10,12,367 सॅपल टेस्ट काल करण्यात आल्या अशी माहिती ICMR ने दिली आहे. (कोरोना बाधितांमध्ये 54% रुग्ण 18-44 वयोगटातील; कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांपैकी 51% रुग्ण 60 वर्षांवरील- आरोग्य मंत्रालय)

ANI Tweet:

कोविड-19 चे संकट अद्याप टळलेले नसले तरी कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी अनलॉक 4 ला सुरुवात झाली आहे. अनलॉक 4 च्या माध्यमातून बंद करण्यात आलेल्या काही सेवा-सुविधा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे, मेट्रो, स्विमिंगपूल, थिएटर्स, शाळा-महाविद्यालये अद्याप बंदच आहेत.