Coronavirus: कोरोना व्हायरस संकटावेळी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी Uber कंपनीने NHA सोबत केली भागिरादी
Uber

ऑनलाईन टॅक्सी बुकींग सेवा देणाऱ्या उबर (Uber) कंपनीने कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटादरम्यान आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवास करता यावा यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. उबर कंपनीने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) सोबत भागिदारी केल्याचे वृत्त आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, नवी दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, कानपूर, लखनऊ, प्रयागराज आणि पाटना यासाठी उबर मेडिक सेवा सुरु करण्यात आली आहे.

या माध्यमातून उपर कंपनी देशातील प्रमुख शहरांमद्ये आरोग्य सेवांसाठी 150 मोफत कार उपलब्ध करुन देणार आहे. सर्व उपर मेडिक एनएचएजवळ पाठविण्यात येईल. या सर्व कार्स पूर्णपणे प्लास्टिक अच्छादित आसन असलेल्या असतील. या कारच्या चालकांची आसनंही पूर्णपणे बंद असतील. जेणेकरुन चालक आणि आरोग्य कर्मचारी यांचा संपर्क येऊ नये. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई विमानतळावरील CISF चे 11 जवान COVID-19 पॉझिटीव्ह, BMC कर्मचाऱ्यालाही कोरोना व्हायरस बाधा)

कोरोना व्हायर संकटाचा अवघा देश सामना करत असताना उबर कंपनीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कारण, गेल्या काही काळात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची मोठीच समस्या निर्माण झाली आहे. सरकारी वाहतूक यंत्रणा सुरु आहे. मात्र, असे असले तरी लॉकडाऊन असल्याने सरकारी वाहनंही रस्त्यांवर यायला मर्यादा पडत आहेत. त्यामुळे उपरची सेवा या कर्मचाऱ्यांना फायदेशीर ठरेल, असे बोलले जात आहे.