
केरळ (Kerala) मध्ये कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झालेला दुसरा रुग्ण आढळला आहे. याआधी चीनमधून (China) परतलेल्या एका विद्यार्थिनीला कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये (Trissur Medical College) तिला दाखल करण्यात आले होते सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.मात्र अशातच दुसऱ्या रुग्णाला सुद्धा ही लागण झाल्याचे आढळून आले आहे. या रुग्णाला आता अलाप्पुझा मेडिकल कॉलेज (Alappuzha Medical College) च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कडून अहवाल मिळाल्यावर याबाबत पुष्टी करण्यात येईल अशी माहिती हेल्थ मिनिस्टर के. के शैलजा (K. K. Shailaja) यांनी सांगितलं आहे. Coronavirus च्या विळख्यातून महाराष्ट्र्र सुटला; सर्व संशियत रुग्णांची चाचणी सिद्ध झाली नकारत्मक
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याला रुग्णालयातील विशेष विभागात ठेवण्यात आलं आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी त्यांचा चीन मधून प्रवास केल्याचा इतिहास आहे आणि त्यामुळंच या व्हायरसची बाधा झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान चीन मध्ये आतापर्यंत या व्हायरस मुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 304 वर पोहचला आहे. या बाधित भागातून भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशी आणणारी एअर इंडिया कडून खाजगी विमानाची दुसरी फेरी आज वुहान येथून दिल्ली येथे पोहचली आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरू असून आतापर्यंत 5, 128 प्रवासी तपासण्यात आले आहेत.