जीवघेण्या कोरोना व्हायरसची (Coronavirus ) लागण आता चीन (China) मधून इतरत्र जगभरात पसरत असताना सुदैवाने महाराष्ट्र (Maharashtra) राज्य मात्र या विळख्यातून सुटले आहे. राज्यातील कोरोना विषाणूच्या सर्व संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले असून रुग्णांना घरी सोडण्याची प्रक्रिया शनिवारी सुरू करण्यात आली आहे. 31 जानेवारी पर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून आलेल्या 5,128 प्रवाशांची तपासणी करण्यात आली होती तसेच मुंबई,पुणे, नागपूर आणि नांदेड मध्ये आतापर्यंत 15 जणांत सौम्य, सर्दी, ताप अशी लक्षणे दिसल्याने त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले होते. या सर्व प्रकरणात चाचणीचा अहवाल हा नकारात्मक आल्याने आत रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने(एनआयव्ही)माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूचा वेग पाहता मुंबईतील चिंचपोकळी परिसरात कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी एक खास वार्ड तयार करण्यात आला होता. तसेच या संदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी 104 हा मदत क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. पुणे येथील आरोग्य सेवेच्या इमारतीमध्ये सुद्धा कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. Coronavirus Precautionary Advisory: जीवाघेण्या कोरोना विषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून खास सूचना जारी; अशी घ्या काळजी!
दरम्यान, केरळ मध्ये मात्र हा धोका अद्याप कमी झालेला नाही, कोरोनाच्या चाचणीत सकारत्मक ठरलेल्या पाहिलंय रुग्णाची स्थिती आता कुठे स्थिर होत असताना आज सुद्धा कोरोना व्हायरसची लागण झालेला दुसरा रुग्ण केरळ मध्ये आढळला आहे. तर चीन मध्ये आतापर्यंत या व्हायरस मुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 304 वर पोहचला आहे. या बाधित भागातून भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशी आणणारी एअर इंडिया कडून खाजगी विमानाची दुसरी फेरी आज वुहान येथून दिल्ली येथे पोहचली आहे.