कोरोना वायरस (Coronavirus) आता चीन मधून पसरत जाऊन भारतासह जगभरात अनेक ठिकाणी त्याचा प्रभाव दिसून आला आहे. हे संकट विचारात घेऊन जागतीक आरोग्य संघटना (WHO) ने जागतिक आरोग्य आणीबाणी देखील घोषीत केली आहे. चीन (China) मध्ये आतापर्यंत तब्बल 10 हजार जणांना कोरोना वायरसची लागण झाली असून त्यापैकी 213 जणांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी चीन मध्ये असणाऱ्या भारतीयांच्या रक्षणासाठी भारतातून खास विमाने वुहान (Wuhan) येथे धाडण्यात आली आहेत, मात्र याप्रकारे देशात परतणाऱ्या नागरिकांना जर का अगोदरच या व्हायरसची बाधा झाली असेल तर त्याचा प्रसार इथे सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे चीन मधून भारतात परतलेल्यांसाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry Of Health) खास सूचना जरी करण्यात आल्या आहि, कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी तुम्ही काय काळजी घ्यावी याबाबत ही सूचना आहे.
कोरोना व्हायरसची लक्षणे ही अगदी लक्षात न येण्यासारखी आहेत, जसे की, अगदी सामान्य सर्दी पडसे झालेल्या व्यक्तीला सुद्धा या विषाणूची बाधा झालेली असू शकते, मात्र पुढे जाऊन यातून रिस्पिरेटरी सिन्ड्रोम सारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो. असे होऊ द्यायचे असल्यास प्रत्येकाने या काही सूचनांचे आवर्जून पालन करावे. (केरळमध्ये Coronavirus चं निदान झालेल्या तरूणीची प्रकृती स्थिर; अजून एक रूग्ण Isolation Ward मध्ये दाखल)
- जर का तुम्ही चीन मधून आला असाल तर निदान काही दिवस लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात राहू नका. शारीरिक स्पर्श तर प्रकर्षाने टाळा.
- कोणत्याही व्यक्तीपासून निदान 1 मीटर लांब राहा.
-खोकताना, शिंकताना नाक आणि तोंड झाकून घ्या.
- अर्धवट शिजवलेले कच्चे मांस खाऊ नये,
- अधिक माहितीसाठी स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या 91- 11- 23978046 या क्रमांकावर संपर्क साधा.
पहा ट्वीट
Advisory for travellers returning from #China:#nCoV2020 #coronavirusindia #CoronavirusOutbreak @PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @PIB_India @MEAIndia @MoCA_GoI @DDNewslive @airnewsalerts pic.twitter.com/DXBsWKmcjl
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) January 30, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरसचा शिरकाव आता भारतात देखील असून केरळ येथे त्याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तो वुहान येथील युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.