Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचे आदेश येत्या 14 एप्रिल पर्यंत दिले आहेत. तरीही दिल्लीत तबलीगी जमातीच्या निजामुद्दीन मरकचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लोकांनी विविध ठिकाणाहून दाखल होत उपस्थिती लावली. त्यानंतर या कार्यक्रमातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या नागरिक आपल्या घरी परतले. पण यांच्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आल्याने तबलीगी समाजील नागरिकांना स्वत:हून पुढे येऊन कोरोनाची चाचणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर 16 वर्षीय एका मुलाने तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दिल्लीतील मरकजचा कार्यक्रम तबलीगी समाजाकडून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी उपस्थिती लावली होती. तसेच अन्य राज्यातील नागरिकांनी सुद्धा या कार्यक्रामला उपस्थिती लावल्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहे. तर छत्तीगढ येथील एका 16 वर्षीय मुलाने दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर कोबरा येथून तो महाराष्ट्रात आला होता. मात्र त्याला पुन्हा छत्तीसगढ येथे पाठवले असता त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहेत.(Coronavirus Outbreak in India: कोरोना व्हायरस विरुद्ध लढा देण्यासाठी 30,000 हून अधिक स्वयंसेवी डॉक्टरांची फौज सज्ज) 

देशातील विविध राज्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2547 इतकी होती. त्यापैकी 162 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. तसेच कालपर्यंत 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. परंतु, आज देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. या आकडेवारीनुसार देशात 2650 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच देशातील सध्याचा कोरोनाबाधितांचा आकडा पाहिला तर त्यामध्ये नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसदरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे आदेश आणखी काही दिवस वाढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप सरकारकडून लॉकडाउनचे आदेश वाढवण्यासंबंधित कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.