कांग्रेस नेते राहुल गांधी हे यूट्यूबवर (Rahul Gandhi YouTube Channel) सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. या रिपोर्टमध्ये गेल्या ६ एप्रिल ते १२ एप्रिलला संपलेल्या आठवड्यातील राजकीय पक्ष व नेत्यांच्या यूट्यूब चॅनेलला मिळालेल्या दर्शकांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही आकडेवारी 18 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आली. राजकीय पक्ष व राजकीय नेते गटातील एकूण दर्शकांपैकी तब्बल 31 टक्के दर्शक हे राहुल गांधी यांचे यूट्यूब चॅनेल पाहत असल्याचे दिसून आले आहे. (हेही वाचा - Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांची माघार, महायुतीसमोर पेच; नाशिकच्या जागेवरुन संभ्रम कायम)
देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही यूट्यूब चॅनेल आहे. त्यांचे सबस्क्राईबर सुद्धा राहुल गांधी यांच्यापेक्षा कितीतरी अधिक आहेत. परंतु त्यांचे यूट्यूब चॅनेल एकूण दर्शकांपैकी केवळ 9 टक्के दर्शक पाहतात. यूट्यूब चॅनेलच्या पहिला दहा दर्शकांमध्ये इंडीया आघाडीतील काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या यूट्यूब चॅनेलने बाजी मारली आहे.
राहुल गांधी यांचे यूट्यूब चॅनेल 5 कोटी 80 लाख दर्शकांनी पाहिलेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पार्टीचे यूट्यूब चॅनेल आहेत. या चॅनेलला 2 कोटी 80 दर्शकांची पसंती लाभली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेस पक्षाचे अधिकृत यूट्यूब चॅनेल इंडीयन नॅशनल काँग्रेस हे 2 कोटी 60 लाख लोकांनी पाहिले तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला या आठवड्यात 1 कोटी 50 लाख दर्शक लाभले आहेत. या गटातील पहिल्या 10 जणांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव नेते नितीन गडकरी यांच्या यूट्यूब चॅनेलला पसंती मिळाली आहे.