रायपूर (Raipur) येथे आज पासून तीन दिवसीय राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे उदघाटन काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तब्बल 5 राज्यातून आलेले 1200 कलाकार तसेच श्रीलंका (Srilanka) , युगांडा (Uganda), बेलारूस (Belarus), मालदीव (Maldives), बांग्लादेश (Bangladesh) आणि थायलंड (Thailand) येथून आलेल्या सहा कलाकारांनी नृत्य सादर केले. विशेष म्हणजे या कलाकार आदिवासी बांधवांच्या सोबत राहुल यांनी सुद्धा पारंपरिक वाद्य वाजवत फेर धरला, या प्रसंगी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी देखील पारंपरिक वेशात नृत्य करत राहुल यांची साथ दिली.
सध्या राहुल यांचा या कार्यक्रमातील सहभाग हा सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून चर्चिला जात आहे, चला तर मग आपणही पाहुयात काय आहे हा व्हिडीओ.. शिवसैनिकांनी राहुल गांधी यांना लगावला अप्रत्यक्ष टोला; त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पाठवले सावरकरांवरील पुस्तक
ANI ट्विट
#WATCH Chhattisgarh: Congress leader Rahul Gandhi takes part in a traditional dance at the inauguration of Rashtriya Adivasi Nritya Mahotsav in Raipur. pic.twitter.com/HpUvo4khGY
— ANI (@ANI) December 27, 2019
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी आज सकाळी या महोत्सवाविषयी ट्विट करत आपला उत्साह व्यक्त केला होता, अशा प्रकारचे महोत्सव हे भारताची वैविध्यता जपणारे आणि संस्कृतीसाठी अत्यंत उपयुक्त असे उपक्रम आहे यातून अत्यंत समृद्ध अशा आदिवासी संस्कृतीचे रक्षण करण्यात मदत होईल अशा आशयाचे राहुल यांचे ट्विट होते.
राहुल गांधी ट्विट
I am in Chhattisgarh today to inaugurate the National Tribal Dance Festival, in Raipur.
This unique festival, is an important step towards showcasing & protecting our rich tribal cultural heritage. pic.twitter.com/FYzVH9OUr6
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 27, 2019
दरम्यान या कार्यक्रमात बोलत असताना राहुल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधण्याची संधी देखील हेरली, आपल्या देशाचा प्रसार पाहता प्रत्येक संस्कृतीच्या , धर्मच्या आणि जातीच्या व्यक्तीचे रक्षण होणे गरजेचे आहे मात्र काही ठिकाणी राज्य सरकार आणि स्वतः केंद्र सरकार याकडे लक्ष देत नाही देशातील अर्थव्यवस्थेवर ही याचा परिणाम झाला आहे असे राहुल यांनी म्हंटले.