छत्तीसगड येथे सुरक्षादल-नक्षलवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

छत्तीसगड (Chhattisgarh) येथे सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांची शुक्रावारी पाहाटेपासून चकमक सुरु आहे. यामध्ये सीआरपीएफ (CRPF) दलातील एका जवान शहीद झाला आहे. त्याचसोबत अजून एक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, धमतरी जिल्ह्यातील सालेघाट जंगलामध्ये ही चकमक सुरु होती. या चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जखमी झालेल्या जवानांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(हेही वाचा-छत्तीसगड: कांकेर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; BSF चे 4 जवान शहीद)

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी नक्षलवाद्यांकडून त्यांच्या प्रभाव क्षेत्रामधील नागरिकांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच नक्षलवाद्यांकडून पत्रके जाहीर करण्यात येत असून बॅनरबाजीसुद्धा केली जात आहे. या सर्व प्रकारात नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांच्या जवानांनासुद्धा लक्ष केले आहे.