छत्तीसगड: कांकेर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; BSF चे 4 जवान शहीद
BSF | Representational Image | (Photo Credits: PTI)

छत्तीसगड (Chhattisgarh) येतील नक्षलवादी परिसर असलेल्या कांकेर (Kanker) जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत BSF चे चार जवान शहीद झाले आहेत. महाला परिसरातील जंगलात गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बीएसएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. यात चार जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाले आहेत.

ANI ट्विट:

यापूर्वी जानेवारी महिन्यात छत्तीसगड आणि महाराष्ट्र सीमेवर वरील कसनसूर गावातीन तीन नागरिकांची हत्या नक्षलवाद्यांनी केली होती. त्यावेळेस नक्षलवाद्यांनी तीन गावकऱ्यांची हत्या करुन मृतदेह रस्त्यावर फेकून दिले होते.