Central Vista Redevelopment Project: 'विद्वानांसाठी खूशखबर! इथे सायंकाळी Ice-Cream खाण्याची मजा आणखी वाढेल', केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे सेंट्रल विस्टा प्रकल्पावर ट्वीट
Central Vista | Photo Credits: twitter)

सेंट्रल विस्टा एवेन्यू (Central Vista Redevelopment Project) आणि नव्या संसद भवन हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेहमीच चर्चेत राहिला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी आज (24 जून) या प्रकल्पाला भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर पूरी यांनी या प्रकल्पाच्या प्रतिमा सोशल मीडियावर शेअर करत सोबत पोस्टही लिहीली. ही पोस्टही आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे. हरदीप सिंह पुरी यांनी या प्रकल्पाच्या सौंदर्याचे कौतुक करताना आमचे मजूर मेहनत आणि सातत्या ठेऊन येणाऱ्या पिड्या वास्तूशास्त्राचा एक उत्कृष्ट ऐतिहासिक वारसा आकाराला घालत आहेत. आज मी सेंट्रल विस्टा एवेन्यू आणि संसदेच्या नव्या ठिकाणाचा आढवा घेतला असे म्हटले. सोबतच या ठिकाणी येऊन सायंकाळी आईस्क्रिम (Ice-Cream) खाण्याची पहिल्यापेक्षाही अधिक येईल असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

[Poll ID="null" title="undefined"]विरोधी पक्षाने म्हटले आहे की, इथे कोरोना व्हायरस महामारीविरोधात झुंजत असलेल्या नागरिकांच्या उपचारासाठी पैसे नाहीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आलीशान निवास बांधत आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नव्या संसद भवनाचा आकार त्रिकोणी असणार आहे. हा संपूर्ण परिसर 64,500 चौरस मीटर इतका आहे. विद्यमान संसद भवनापेक्षी ही वास्तू प्रचंड मोठी असणार आहे. नव्या इमारतीत लोकसभेचे 888 खासदार आणि राज्यसभेचे 348 खासदार बसण्याची व्यवस्था आहे. विद्यमान स्थितीची चर्चा करायची तर लोकसभेत 545 आणि राज्यसभेत 245 खासदार आहेत. (हेही वाचा, Equal Opportunity To Women: महिला आता रात्रीच्या वेळीही काम करु शकतात; केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांची माहिती)

हरदीप पुरी ट्विट

कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेत सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यातच 20,000 कोटी रुपये जमा केले होते. वाढत्या रुग्णसंख्येमळे देशासमोर ऑक्सिजन, बेड आणि औषधांचे संकट उभे राहिले. त्यामुळे वाढत्या कोरोना व्हायरस महामारीच्या संकटाला डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षाने केंद्र सरकारला अवाहन केले की, ही कोरोना स्थिती हाताळण्यासाठी सरकारने अधिकाधिक पैसा खर्च करावा. सेंट्रल विस्टा सारख्या प्रकल्पांना इतक्यात खर्च वाढवू नये.