गेल्या महिन्यांत कांद्याचे दर 100 रुपयांच्या पार गेल्याने सामान्यांना त्याचा चांगलाच फटका बसला होता. कांद्याच्या दरवाढीमागील मुख्य कारण म्हणजे राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका त्याला बसला होता. त्यानंतर केंद्र सरकारने कांद्याचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला. तर सध्या बाजारात कांद्याचे दर 58 रुपये किलो आहे. मात्र लवकरच सरकारकडून कांदा 22-23 रुपये किलोने विकला जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून सातत्याने कांद्याचे दर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच केंद्र सरकारच्या बंदरांवर कांदा सडत चालल्याने त्याचे दर कमी होण्याची शक्यता अधिक आहे.
सरकारने कांद्याच्या वाढत्या किंमतीची बाब लक्षात घेता, नोव्हेंबर 2019 मध्ये एमएमटीसीच्या माध्यमातून 1.2 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला होता. एमएमटीसीने विदेशातील बाजारातून 14 हजार टन कांदा आयात केला आहे. सुत्रांनी असे सांगितले आहे की, आयात केलेला कांदा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील बंदरांवर पडून आहे. नवा कांदा बाजारात येत असल्याने त्याच्या खरेदी किंमतीत घट होत आहे. याच परिस्थितीत काही राज्य अधिक दरात आयात केलेला कांदा खरेदी करण्यास तयार नाही आहे.(Union Budget 2020: मोदी सरकारकडे निधीची कमतरता, मनरेगा मजूरांचे वेतन थकले, SSB जवानांचे पगारही नाही मिळाले)
सुत्रांनी असे म्हटले आहे की, आयात केलेल्या कांद्याची चव ही राज्यातील कांद्याच्या चवीपेक्षा वेगळी आहे. याच कारणामुळे आयातित कांद्याचे ठेके रद्द करण्यात आले आहेत. आता पर्यंत मोठ्या प्रमाणात बंदरांवर कांद्याचा खप पडला आहे. नाफेड, मदर डेअरी आणि अन्य राज्यातमधील सरकार त्यांच्या बाजारात कांद्याची विक्री 22-23 रुपये किलोने केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.