CBI (Photo Credits-Twitter)

सीबीआयकडून (CBI) लैंगिक शोषण प्रकरणी मोठी कारवाई करत 83 आरोपींच्या विरोधात 23 गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व आरोपींवर मुलांचे लैंगिक शोषण करण्यासह त्यांचे व्हिडिओ बनवून विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने 14 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 76 ठिकाणी छापेमारी करत आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सीबीआयने दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, युपी, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, उडिसा आणि तमिळनाडू येथे छापेमारी करत आहे.

गेल्या वर्षात सुद्धा सीबीआयने या अशा प्रकारात युपी सरकारमध्ये काम करणाऱ्या ज्युनिअर इंजिनिअर राम भुवन यादव आणि त्याची पत्नी दुर्गावती हिला अटक करण्यात आली होती. हे दोघे मुलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ तयार करुन डार्कनेटवर विक्री करत होते. याच प्रकारे सीबीआयने जम्मू-कश्मीरमध्ये राहणाऱ्या नियाज अहमद मीर याला सुद्धा अशाच प्रकरणात अटक केली होती. जो अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या पत्नीच्या माध्यमातून मुलांचे लैंगिक शोषण करणारे व्हिडिओ आणि फोटो डार्क नेटच्या माध्यमातून विदेशात विक्री करायचा. FBI ला जेव्हा या गोष्टी बद्दल कळले तेव्हा त्यांनी याची सुचना सीबीआयला दिली. त्यानंतर अटक करण्यात आली.(Amazon वर गांजा विक्री केल्याचा आरोप, CAIT ची NCB तपास करण्याची मागणी)

तर सीबीआयने 2019 मध्ये मुलांचे शोषणाच्या प्रकरणात गंभीर्याने लक्ष देत Online Child Sexual Abuse And Exploitation (OCSAE) Prevention/Investigation Unit तयार केले होते. ते सीबीआयच्या स्पेशल क्राइम युनिटअंतर्गत काम करत आहेत. यांचे काम मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधित व्हिडिओ, फोटोंची विक्री किंवा इंटरनेटवर अपलोड करणाऱ्यांवर नजर ठेवणे आणि त्यांच्या विरोधाक कारवाई करणे आहे.