Anti-corruption Department Raids Gov Engineer's house: गुवाहाटीमध्ये सरकारी अभियंत्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा, 79 लाखाची रक्कम जप्त, गुन्हा दाखल
Anti-corruption department raids government engineer's house PC TWITTER

Anti-corruption Department Raids Gov Engineer's house: आसाममधील गुवाहाटीमध्ये सरकारी अभियंत्याच्या ( Goverment Engineer's) घरात तब्बल 79 लाख 87 हजार 500 रुपयांचे घबाड आढळून आलं आहे. सोमवारी दक्षता कर्मचाऱ्यांनी सरकरी अभियंत्याला राहत्या घरातून लाचखोरीच्या गुन्ह्याअंतर्गत अटक (Arrest) केले आहे. दक्षता कर्मचाऱ्यांनी आणि लाचलूचपत प्रतिबंधक संचालयाने सरकरी अभियंताच्या घरी छापा टाकला होता. याच दरम्यान घरातून ७९ लाख रुपये जप्त केले. (हेही वाचा- कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी भाजप Devaraje Gowda यांना अटक

वीस हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथील हेंगराबारी येथील अभियंत्याच्या घरी लाचलुपत प्रतिबंधक संचालयाने छापा टाकला होता. घरातून तब्बल  79,87,500 रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. या अभियंताचे नाव जयंत गोस्वामी असं आहे. गोस्वामी यांनी गुवाहाटी येथील हंगराबारी परिसरातील धुव्रा हॉटेलमध्ये २०,००० लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले होते. त्यानंतर चौकशीतून दक्षता आणि लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने घरात छापा टाकला.

गुन्हा दाखल

या झडतीत दक्षता विभागाला घरातून  79 लाख 87 हजार 500 रोख रक्कम सापडली. सरकारी अभियंत्याच्या घरातून एवढी रक्कम जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अभियंत्यावर गुन्हा दाखल होताच, त्याला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. चौकशीतून असे समोर आले की, गोस्वामी यांना आता पर्यंत अनेकांकडून लाच स्वीकारली होती.