ED Raids In Jharkhand: कॉंग्रेसचे आमदार आलमगीर आलम यांच्या पर्सनल सेक्रेटीरी संजीव लाल यांच्या घरावर ईडीचा छापा, 35 कोटी रक्कम जप्त
Enforcement Directorate Raid In Ranchi PC TWITTER

ED Raids In Jharkhand: झारखंडमध्ये ग्रामीव विकास मंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार आलमगीर आलम यांचे पर्सनल सेक्रेटरी  संजीव लाल यांच्या घरावर अंमलबजावणी संजालनालयाने छापा टाकला आहे. संजीव लाल यांच्या घरातून 32 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख जप्त केली आहे. मंगळवारी या प्रकरणी संजीव आणि त्यांच्या नोकराला अटक केले आहे. वीरेंद्र राम प्रकरणात  (2023) झारखंडमध्ये ईडी छापा टाकत आहे. त्यात संजीव लाल यांच्या घरी छापा टाकला. (हेही वाचा- गौतम बुध्द विद्यापीठाच्या वसतिगृहातील पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह)

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणा कॉंग्रेसचे आमदार आलमगार आलम यांची चौकशी करण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांनी सांगितले. सोमवारी रांची येथील 2BHK फ्लॅटवर छापा टाकला होता. ईडीने छाप्यात एका ठिकाणहून 3 कोटी रोख रक्कम काढली आणि त्यानंतर 32 कोटी रुपयांची रोख बाहेर काढली. ईडीने एकून 35 कोटी रक्कम जप्त केली.

मोजणी सुरू ठेवण्यासाठी कॅश मशीन्स तैनात केल्या जात असल्याने रोख रक्कम अधिक असणे अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून वीरेंद्र राम प्रकरणात ईडी झारखंडमध्ये विविध ठिकाणी छापे टाकत आहे.  ही घटना बाहेर येताच, आलमगीर आलमला तात्काळ ताब्यात घेऊन रोख रकमेबाबत कठोर चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे.