Ganja | PC: IANS

लहान उद्योजकांची संघटना कंफडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्स यांनी आरोप लावला की, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या अॅपवर गांजा विक्री केली जात आहे. CAIT ने नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला या प्रकरणी तपास करण्याची मागणी केली आहे. या आरोपावर अॅमेझॉनने म्हटले आहे की, ते स्वत: या प्रकरणी तपास करत आहे. तर अॅमेझॉनवर अशा कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांची विक्री करण्यास परवानगी नाही आहे.(Bihar: पाकिस्तानी महिलेला गुप्तचर माहिती दिल्याप्रकरणी बिहार एटीएसने दानापूर येथील एका लष्कर अधिकाऱ्याला अटक)

खरंतर मध्य प्रदेशातील पोलिसांनी भिंड येथे एका ड्रग पेडरलचा पर्दाफाश केला आहे.या रॅकेटने कथित रुपात अॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरुन स्टिवियाच्या पत्त्याच्या बहाण्याने गांज्याची विक्री केली होती. आरोप आहे की, अॅमेझॉनच्या माध्यमातून काही लोकांनी 390 पॅकेटमध्ये जवळजवळ 1 हजार किलो गांजा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विक्री केला आहे. कॅटने एका विधानात असे स्पष्ट केले की, या प्रकरणी सुरज पवैया आणि विजेंद्र सिंह तोमर नावाच्या दोन लोकांना अटक केली आहे.

भिंडचे एसीपी मनोज कुमार सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत असे म्हटले क, पोलिसांनी एका ड्रग पेडलर्सकडून अॅमेझॉनची पाकिट जप्त केली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अॅमेझॉनना सुद्धा नोटिस पाठवली आहे.(Cyber Crimes Against Children: मुलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये 400% पेक्षा जास्त वाढ; 'या' 5 राज्यांमध्ये आढळली सर्वाधिक प्रकरणे)

या प्रकरणी अॅमेझॉनच्या एका प्रवक्त्याने असे म्हटले की, या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. तर अॅमेझॉनवर विक्री केल्या जाणाऱ्या सर्व उत्पादनांना त्यांच्या नियमांचे पालन करावे लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही उत्पादनांना विक्री किंवा त्यांच्या लिस्टिंगसाठी परवानगी देत नाही.