Mumbai Customs Seize Ganja (फोटो सौजन्य - X/@mumbaicus3)

Mumbai Customs Seize Ganja: मुंबई सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी (Mumbai Customs Officials) शनिवारी, 19 ऑक्टोबर रोजी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIT) बँकॉक (Bangkok) हून आलेल्या एका प्रवाशाची तपासणी केली. यावेळी या प्रवाशाच्या सामानात लपवून ठेवलेला 8.909 किलो  (Ganja) अधिकाऱ्यांनी जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे आठ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, खेळणी आणि खाद्यपदार्थ असलेल्या बॉक्समध्ये हा गांजा चतुराईने लपवण्यात आला होता. मात्र, सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशाने लपवून ठेवलेली गांजाची पाकिटे शोधली. (हेही वाचा - Rats Damaged Ganja: उंदरांना लागलं अमली पदार्थांचे व्यसन! आधी लाखोंची दारू प्यायली, नंतर गटकला करोडोंचा गांजा)

बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 8 कोटी रुपयांचा 8.9 किलो गांजा जप्त -

कस्टम अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवाशाला तात्काळ अटक केली. सीमाशुल्क कायदा, 1962 आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायदा, 1985 मधील तरतुदींनुसार या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.