Faridabad Tragic Accident: हरियाणा येथील जुन्या फरिदाबाद रेल्वे ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात एक कार बुडाल्याने शुक्रवारी रात्री बॅंकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत कर्मचारी हे HDFC बॅंकेचे कर्मचारी होते. पहाटे २ च्या सुमारास ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून हरियाणा येथे मुसळधार पाऊस सुरु असल्याने ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. (हेही वाचा- रुळ ओलांडताना कारला रेल्वेची धडक, एकाचा जागीच मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, बॅंकेचे व्यवस्थापक आणि युनियनचे अध्यक्ष पुण्यश्रेया शर्मा आणि गुरुग्राममधील सेक्टर ३१ शाखेतील रोखपाल विराज द्विवेदी अशी मृतांची नावे आहे. मागील काही दिवसांपासून हरियाणा येथे मुसळधार पाऊस पडत होता. ज्यामुळे ब्रिजखाली पाणी साचले होते. बॅंकेचे दोन्ही कर्मचारी येथे अडकून राहिले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शर्मा यांच्या पत्नीने पतीला फोन करण्याचा प्रयत्न केला पण ते फोन उंचलू शकले नाही. तेव्हा त्यांच्या पत्नीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हरियाणा : फरीदाबाद में रेलवे अंडरब्रिज के नीचे भरे बारिश के पानी में महिंद्रा XUV-700 डूब गई। इसमें बैठे HDFC बैंक मैनेजर पुण्यश्रेय शर्मा और कैशियर विराज द्विवेदी की मौत हुई।
अंदाजा नहीं था कि पानी इतना भरा होगा। कार पानी में बंद होकर लॉक हो गई। वो बाहर नहीं निकल सके। pic.twitter.com/CBq5ZJ3CXf
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) September 14, 2024
फरिदाबादमध्ये आल्यानंतर अंडरपासजवळ त्यांना स्थानिक पोलिस दिसले. अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली की, एक कार पूरात अडकली आहे. त्या गाडीत दोन जण अडकले होते. बचावकार्य दोघांपर्यंत वेळेवर पोहचू शकले नाही. त्यामुळे दोघांन्ही जीव गमावला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांनी पोलिसांनावर संताप व्यक्त केला आहे. अंडरपासमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स का लावले नाहीत असा सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला.