BSF First Woman Sniper: कोण आहेत Suman Kumari? जाणून घ्या बीएसएफच्या पहिल्या महिला स्निपरबद्दल
Sniper | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Woman Sniper Suman Kumari: सीमा सुरक्षा दलाला (BSF) सेवेत पहिल्या महिला स्निपर मिळाल्या आहेत. सुमन कुमारी असे त्यांचे नाव आहे. त्या सब-इन्स्पेक्टर आहेत. महिला आणि पुरुष यांच्यातील असमानता दूर करत बीएसएफने त्यांचे स्वागत केले आहे. इंदूरच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्स (CSWT) मध्ये प्रशिक्षण घेऊन सुमन कुमारी यांनी एक मैलाचा दगड असणारी कामगिरी केली आहे. त्यांनी कोर्समध्ये 'इन्स्ट्रक्टर ग्रेड' मिळवली आहे. बीएसएफ सीएसडब्ल्यूटी इंदूरने शनिवारी आपलया एक्स हँडलवरुन माहिती देताना म्हटले आहे की, बीएसएफ खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक फोर्स बनत आहे. जिथे महिला सर्वत्र वेगाने प्रगती करत आहेत. या दिशेने एक पाऊल म्हणून, कठोर प्रशिक्षणानंतर, बीएसएफला पहिली महिला स्निपर मिळाली आहे.

टाइम्स ऑफ इंडिया (TOI) ने दिलेल्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशातील, पंजाबमध्ये प्लाटूनचे नेतृत्व करत असलेल्या सुमनने सीमेपलीकडून स्निपर हल्ल्याचा धोका पाहिल्यानंतर स्निपर कोर्ससाठी स्वेच्छेने काम केले होते.त्यांची जिद्द पाहून तिच्या वरिष्ठांनी सुमनला कोर्समध्ये सहभागी होण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे, स्निपर कोर्स करणाऱ्या 56 पुरुष समकक्षांमध्ये सुमन ही एकमेव महिला होती. तिच्या यशामुळे, तिच्याकडून इतर महिला भरतींना अशाच प्रकारच्या लष्करी भूमिका घेण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे, CSWT आयजी भास्कर सिंग रावत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, यांनी स्पष्ट केले की स्निपर कोर्सचे प्रशिक्षणार्थी जे 'अपवादात्मक' कामगिरी करतात त्यांना अल्फा आणि ब्राव्हो ग्रेडिंग मिळते, परंतु सुमनने मिळवलेल्या 'इन्स्ट्रक्टर ग्रेड'साठी वेगळी स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाते. ही श्रेणी तिला स्निपर प्रशिक्षक म्हणून पोस्ट करण्यास पात्र बनवते.

स्नायपर्स विषयातील जाणकार आणि प्रशिक्षक सांगतात की, स्नायपर कोर्सला खूप शारीरिक आणि मानसिक ताकद लागते. त्यामुळे आम्ही यावर्षी प्रशिक्षित व्यवस्था वाढवली आहे जेणेकरून स्नायपर शत्रूच्या अधिक जवळ जाऊ शकेल. बहुतेक पुरुष प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षणात टिकून राहणे कठीण जाते आणि त्यांनी कोर्सचा प्रयत्न देखील केला नाही परंतु सुमन कुमरी यांनी स्वेच्छेने काम केले. मला सांगायला आनंद होत आहे की अभ्यासक्रमादरम्यान ती बहुतेक क्रियाकलापांमध्ये अग्रेसर होती. तिची मेहनत, दृढनिश्चय आणि शिकण्याची इच्छा तिला वेगळी बनवते, असे तिच्या एका प्रशिक्षकाने टाईन्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.