BJP MP Arvind Sharma's Controversial Statement Video:  'हात कापू, डोळे काढू' भाजप खासदार अरविंद शर्मा यांचे वादग्रस्त विधान, व्हिडिओ व्हायरल
BJP MP Arvind Sharma with Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

भाजप खासदार अरविंद शर्मा (Arvind Sharma) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाला धमकी दिली आहे. शर्मा यांनी जाहीर भाषणात म्हटले आहे की, 'लिहून ठेवा.. माझे पक्ष सहकारी मनीष ग्रोवर (Manish Grover) यांचा जर विरोध कराल तर हात कापू, डोळेही काढू.' अरविंद शर्मा हे हरियाणातील (Haryana) खासदार आहेत. धक्कादायक म्हणजे अरविंद शर्मा यांनी जाहीररित्या दिलेल्या या धमकीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मनीष ग्रोव्हर यांना किलोई गावातील मंदिर परिसरातील काही संतप्त शेतकऱ्यांनी घेरले होते. त्यांना संतप्त शेतकऱ्यांनी बराच काळ घेराव घालून बंद करुन ठेवले होते. ग्रोवर यांनी केंद्र सरकार आणि केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेख 'बेरोजगारी दारुडे' आणि 'वाईट विचारांचे' असा केला होता. तसेच, आपण कृषीविधेयकास विरोध करणाऱ्यांना लांब करण्याचा विचार करतो आहे, असेही म्हटले होते. ग्रोव्हर यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप होता. (हेही वाचा, 'नथूराम गोडसे देशभक्त', भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वादग्रस्त विधान)

व्हिडिओ

संतप्त शेतकऱ्यांनी भाजप नेते मनिष ग्रोव्हर आणि त्यांच्या समर्थकांना तब्बल 8 तास कोंडून ठेवले होते. त्यानंतर ग्रोव्ह यांनी शेतकऱ्यांना हात जोडले. त्यांनतर संतप्त शेतकऱ्यांनी ग्रोव्हर यांची सुटका केली. दरम्यान, सुरक्षीतपणे बाहेर आल्यानंतर ग्रोव्हर यांनी सांगितलेकी, मी माफी मागितली नव्हती. उलट मी सांगितले की, मला वाटेल तेव्हा मी मंदिरात येईन. ग्रोव्हर यांच्यासोबत मंदिरात बंद करण्यात आलेल्यांध्ये मंत्री रविंद्र राजू, रोहतकचे महापौर मनमोहन गोयल आणि पक्षाचे नेते सतीश नंदल हे होते.