Cochin Carnival मध्ये उभारलेला 'Pappanji' पुतळ्याचं साधर्म्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी मिळत जुळत असल्याचा दावा करत नवा वाद सुरू झाला आहे. दरम्यान हा कार्निवल कोच्ची फोर्ट वर आयोजित करण्यात आला आहे. या वादानंतर स्थानिक भाजपा नेते, कार्यकर्ते यांनी पुतळ्यावर आक्षेप घेत पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहे.
भाजपा कार्यकर्त्यांच्या मते, अशाप्रकारे Cochin Carnival मध्ये उभारलेला पुतळा हा पंतप्रधानांचा अपमान करणारा आहे. सध्या आयोजक आता हा पुतळ्याचा चेहरा बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Cochin Carnival मध्ये Pappanji ला 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जाळून नववर्षाचं स्वागत करण्याची पद्धत आहे. पप्पनजी हे सांता क्लॉज सारख लांब दाढी असलेलं काल्पनिक पात्र आहे. जे दरवर्षी प्रसिद्ध कलाकारांद्वारे विशिष्टपणे डिझाइन करून बनवलं जातं.यामध्ये अनेक नामवंत कलाकार सहभाग घेत असतात.
#Kochi: A controversy has broken out after local #BJP leaders complained to police that the face of huge 'Pappanji' effigy erected as part of the famed Cochin Carnival resembles Prime Minister #NarendraModi. pic.twitter.com/z0Wxr9Q9yU
— IANS (@ians_india) December 29, 2022
भाजपाने यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यामध्ये बदल केले जाणार आहेत. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. योगायोगाने, भाजप नेते देखील कार्निवल समितीचा भाग आहेत ज्यात विविध पक्षांचे प्रतिनिधीत्व करणारे लोक आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. नक्की वाचा: कोलकाता मध्ये Hindu Mahasabha च्या Durga Puja Pandal मध्ये Mahatma Gandhi चं रूप 'महिषासूर' च्या जागी; तक्रारीनंतर वादग्रस्त दिखाव्यात बदल .
Cochin Carnival चं यंदाचं 39 वं वर्ष आहे. Pallathu Raman Square मध्ये यानिमित्ताने चित्रकला प्रदर्शन, मॅरेथॉन, सायकल रॅली, फूड फेस्ट, कोकणी भाषा फेस्ट, कयाकिंग, फुटबॉल आणि इतर खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत.