All India Hindu Mahasabha । PC: ANI

भारतामध्ये नवरात्रीची (Navratri) धूम सुरू आहे. कोलकाता मध्ये षष्ठी पासून पुढील चार दिवस दुर्गापूजा साजरी केली जाते. पण कोलकातामध्ये अखिल भारतीय हिंदू महासभा (All India Hindu Mahasabha) द्वारा आयोजित पंडालामध्ये वादग्रस्त दिखाव्यावरून वाद वाढल्याचं पहायला मिळालं आहे. या दिखाव्यामुळे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या रूपाशी साधर्म्य साधणारं एक रूप महिषासूर (Mahishasur) म्हणून दाखवण्यात आलं होतं. आयोजकांकडून गांधीजींचं रूप आणि वादाग्रस्त महिषासूराचं रूप यामधील साधर्म्य हा केवळ योगायोग आहे.

सध्या या वादग्रस्त दिखाव्याचे फोटो वायरल झाल्यानंतर आणि वाद वाढल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आज सकाळी या दिखाव्यातून वादग्रस्त महिषासूराचं गांधीजींप्रमाणे दिसणारं रूप हटवण्यात आले आहे. या प्रकरणी ऑल इंडिया हिंदू महासभा विरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: Mahatma Gandhi vs WWE Legend Big Show यांच्या अ‍ॅनिमेटेड बॉक्सिंग व्हिडिओ वर भडकले ट्वीटर युजर्स (Watch Video) .

पहा जुनं आणि नवं रूप

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या पश्चिम बंगाल राज्य युनिटचे कार्याध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये, “डोक्यावर केस नसलेली आणि चष्मा असलेली व्यक्ती गांधी असतेच असे नाही. असुराच्या हातात ढाल आहे. गांधींनी कधीही ढाल ठेवली नाही. आपला 'असुर' ज्याला आई दुर्गा मारत आहे, तो गांधींजींसारखा दिसतो, हा योगायोग आहे. तो गांधीसारखा दिसतो, असे अनेकांनी सांगितले. मात्र, गांधींवर टीका केली पाहिजे हेही खरे आहे.

दुर्गापूजेच्या या पंडालावर टीएमसी आणि काँग्रेससह सर्व पक्षांनी जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कुणाल घोष यांनी याला 'अभद्रतेची उंची' असे म्हटले आहे.