छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपाने मोठ्या बहुमताने जिंकल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने आपली तयारी सुरू केली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाने महत्त्वाचा बदल केला आहे. भाजपाने छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी (New State President) पहिल्यांदाच आमदार झालेल्या किरणसिंह देव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. देव यांनी अरूण साओ यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. किरणसिंह देव हे बस्तर जिल्ह्यातील जगदलपूरचे मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या काही वर्षांपासून देव यांचे या प्रदेशात राजकीय प्रस्थ वाढत आहे. (हेही वाचा - Chhattisgarh CM: विष्णुदेव साई 13 डिसेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार कार्यक्रमाला उपस्थित)
2018 साली काँग्रेसने या प्रदेशातील 12 पैकी 11 जागांवर विजय मिळवला होता. एका जागेवर नंतर पोटनीवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीही येथे काँग्रेसनेच बाजी मारली होती. मात्र आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकूण 12 पैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे. देव हे बस्तर जिल्ह्यातील दुसरे नेते आहेत, ज्यांची भाजपाने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे.
“देव यांच्या नेतृत्ववाखाली भाजपा छत्तीसगडमध्ये नक्कीच नवी उंची गाठेल” असे साय म्हणाले. “देव यांच्यात ती पात्रता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेसला छत्तीसगडमधून हद्दपार करू. आम्ही लोकसभेच्या पूर्ण 11 जागा जिंकू,” असा विश्वास छत्तीसगडचे नवनियुक्त मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी म्हटले आहे.