Bird Flu: महेंद्र सिंह धोनी याला कडकनाथ पुरवणाऱ्या पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू चा शिरकाव
एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

Bird Flu:  एमपी मध्ये झाबुआ येथील रुडीपाडा गावातील पोल्ट्री फार्म मधील कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी भोपाळ येथून त्या बद्दल पुष्टी झाल्यानंतर जिल्ह्यातील पशू विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. याच पोल्ट्री फार्म मधून प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी याने सुद्धा कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर दिली होती.(Bird Flu Update: भारतात कोरोना महामारी दरम्यान 'बर्ड फ्लू'मुळे दहशत; 'या' राज्यात अलर्ट)

मंगळवारी उशिरा सूचना मिळाल्यानंतर नगर पालिकेची गाडी आणि जेसीबीसह तहसीलदार आणि पशू विभागाचे अधिकारी सुरक्षा किट घालून घटनास्थळी पोहचले. प्रोटोकॉलच्या मते, पोल्ट्री फार्म मधील शिल्लक राहिलेल्या कडकनाथ यांना ठार मारले जात आहे. डॉक्टरांनी असे म्हटले की, बर्ड फ्लू चा 1 किमी क्षेत्रात हा प्रसार थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. याच अंतर्गत जीवंत आणि मृत्यू झालेल्या कोंबड्यांना जमिनीत पुरले जात आहे.(Bird Flu FAQs: अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का? Avian Influenza धोका माणसाला किती? जाणून घ्या बर्ड फ्लू संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे)

महेंद्र सिंह धोनी याने गेल्या वर्षात नोव्हेंबर मध्ये याच पोल्ट्री फार्म मधून 2 हजार कडकनाथ कोंबड्यांची पिल्ले मागवली होती. त्यानुसार रांची येथील फार्म हाउस वर याची फार्मिंग केली जाणार होती. धोनीने फार्म हाउसवर डेयरी फार्मिंगसाठी साहीवाला प्रजातीच्या गायी ठेवल्या आहेत. त्याचसोबत फिश फार्मिंग सुद्धा केली जात आहे. या व्यतिरिक्त या फार्ममध्ये बदक आणि पोल्ट्री फार्मिंग ही केली जात आहे.