Earthquake In Assam | (Photo Credit: Twitter)

असम (Assam) राज्यात अनेक ठिकाणी आज (28 एप्रिल) भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 8 वाजणेच्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांनी घर आणि भींतींना तडे गेले. नागरिकांनी सुरक्षीत ठिकणी आश्रय घेतला. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची 6.4 रिश्टर स्केल (Richter Scale) इतकी नोंद झाली. असम (Assam) राज्यासोबतच उत्तर बंगाल भागातही काही प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र असम राज्यातील तेजपूर येथून 43 किलोमीटर पश्चिमेला होते. भारतीय वेळनुसार सकाळी 7.51 वाजता सतह पासून 17 किलोमीटर जमीनीखाली आला. भूकंपाच्या घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री सर्बानंद सोनेवाल (CM Sarbananda Sonowal) यांनी म्हटले आहे की, असममध्ये मोठा भूकंप आला आहे. सर्व लोक या कठीण स्थितीचा सामना करत आहेत. माझी लोकांना विनंती आहे की सजग रहा. मी सर्व जिल्ह्यांतून माहिती घेत आहे.

असममध्ये आलेल्या भूकंपाबाबत असमचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांनी भूकंपाची तीव्रता 6.7 इतकी सांगितली आहे. त्यांनी गुवाहटी येथे भूकंपामुले झालेल्या नुकासानीची काही छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार तेजपूर पासून जवळच भूकंपाचा पहिला धक्का 7.51 वाजता जाणवला. तेजपूरपासून 43 किलोमीटर पश्चिममेस जमीनीखाली 17 किलोमीटर भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपानंतर काही वेळात आणखी काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.3 आणि 4.4 इतकी होती. (हेही वाचा, Palghar Earthquake: पालघर जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट)

भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, असममध्ये काही ठिकाणी भिंतींना तडे गेले. काही ठिकाणी भिंती कोसळल्या तर घरांचे छतही कोसळले. सोशल मीडियावर लोकांनी भूकंपाबाबतचा अनुभव सांगीतला आहे. काही लोकांनी म्हटले की भूकंपाचा पहिला धक्का 30 सेंकंद इतका होता. दरम्यान, झालेल्या नुकसानाचा नेमका आकडा अद्याप पुढे आला नाही.