संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) कोरोना संकटाशी लढा देत असताना पालघर जिल्ह्यात (Palghar) आज (17 जानेवारी) रात्री 10 वाजून 45 सेकंदाच्या सुमारास पुन्हा एकदा भुकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले गेले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी मोजण्यात आली आहे. हा धक्का तलासरीमधील अच्छाड, धुंदलवाडी, आंबोली, बहारे या भागांसह डहाणू तालुक्यातील कासा, सुर्यानगर ,धानीवरी, ऊर्से येथेही जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सुदैवाने, या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी, धुंदलवाडी भागांत सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. महत्वाचे म्हणजे, या भूकंपाचे सत्र हे मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरु आहे. याचत आज आलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची जाणीव होताच लोक ताबडतोब घराबाहेर पडले. हे देखील वाचा- Maharashtra Weather Update: महाराष्ट्र थंडीने गारठला, गोंदियात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
एएनआयचे ट्वीट-
Earthquake of magnitude 3.5 on the Richter scale hit Palghar in Maharashtra at 22:00:45 IST today: National Center for Seismology
— ANI (@ANI) January 17, 2021
याआधी गुरुवारी (15 जानेवारी) इंडोनेशियातील सुलावेली बेटावर 6.2 तीव्रतेचा भूकंप आला होता. यात 35 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, 700 पेक्षा अधिकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. एवढेच नव्हेतर, जवळपास दीड हजारांपेक्षा अधिक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.