आई वडिलांच्या वादाला कंटाळून 15 वर्षीय मुलाची इच्छा मरणाची मागणी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र
Image For Representation (Photo Credits: PTI, File Image)

बिहार:  भागलपूर  (Bhagalpur) जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने आई वडिलांच्या सततच्या वादाला कंटाळून इच्छा मरणाची मागणी केली आहे. यासाठी या मुलाने थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)  यांना पत्र लिहिले आहे. कहलगाव ठाणे अंतर्गत असणाऱ्या महिषामुंडा गावातील रहिवाशी मनोज कुमार मित्रा यांच्या 15 वर्षीय कृष कुमार मित्रा (Krush Kumar Mitra)  या मुलाने राष्ट्रपतींना हे पत्र लिहिलं होतं. कृषने राष्ट्रपती कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनाही पत्र पाठविले होते. यासंदर्भात माहिती मिळताच राष्ट्रपतींकडून हे पत्र तातडीने पंतप्रधान कार्यालयाला (PMO) पाठविले, ज्यानंतर या कार्यालयाने जिल्हा प्रशाकीय कार्यालयाला याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार. कृष मित्राने पत्रात, " माझ्या आई कडून वारंवार माझा छळ केला जातो. अनेकदा आईने मला धमक्या दिल्या आहेत त्यामुळे मला त्रास होत आहे. माझे वडील कॅन्सर पीडित आहेत. आई वडिलांमध्ये सतत काही ना काही कारणावरून वाद होत असतात शिवाय माझ्या घरच्यांना सुद्धा आईचे वागणे पटत नाही, घरातील हा रोजचा कलह पाहता माझी जगण्याची इच्छा नाही त्यामुळे मला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली आहे. नवऱ्याने स्वस्तातला मोबाईल दिला भेट, बायकोने केली आत्महत्या; भोपाळ येथील घटना

 कृष हा त्याचे वडील मनोज कुमार मित्रा यांच्यासोबत राहतो. तो सध्या नववीच्या वर्गात शिकत आहे. कृषचे वडील सध्या ग्रामीण विकास विभागात जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर आई सुजाता इंडियन ओवरसीज बँक पटणा येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कार्यरत आहे.मनोज आणि त्यांची पत्नी सुजाता यांच्यात अनेक वर्षापासून वादविवाद सुरु आहेत. त्यांच्या भांडणामुळे हे दोघंही वेगळे राहतात.या कौटुंबिक कलहामुळे माझी जगण्याची इच्छा नाही असं सांगत त्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधानांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.