Bajrang Punia, Vinesh Phogat, Sakshi Malik | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि दिल्ली येथील आंदोलनातील प्रमुख कुस्तीपटू आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यात बुधवारी (6 जून) सकाळी भेट झाली. ही भेट ठाकूर यांच्या निवास्थानी पार पडली. या भेटीच्या रुपात केंद्र सरकारने एक पाऊल मागे येत रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख असलेल्या भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीटूंसोबत संवादाचा एक दरवाजा मोकळा केला.

अनुराग ठाकूर यांच्या भेटीनंतरही कुस्तीपटू आंदलनावर ठाम राहिले. लैंगिक छळाचा आरोप असलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक होईपर्यंत कुस्तीपटूंनी आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कुस्तीपटूंनी ठाकूर यांना ठासून सांगितले. दरम्यान, या आंदोलनातील प्रमुख चेहरा असलेल्या विनेश फोगाट या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत. कारण त्या पूर्वनियोजित असलेल्या त 'पंचायती'मध्ये सहभागी होण्यासाठी हरियाणातील बलाली गावात दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, अनुराग ठाकूर यांच्या भेटीसाठी बजरंग पुनिया, रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक आणि तिचा कुस्तीपटू पती सत्यवर्त कादियान हे त्यांच्या निवास्थानी पोहोचले. दुसऱ्या बाजूला भारतीय किसान युनियन (BKU) चे नेते राकेश टिकैतयांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परंतू, ते या बैठकीचा भाग नव्हते. (हेही वाचा, Wrestlers' Protest: 'आम्ही चर्चेसाठी तयार', केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कुस्तीपटूंना निमंत्रण; खेळाडूंच्या भूमिकेकडे क्रीडावर्तूळाचे लक्ष)

व्हिडिओ

दिल्ली येथील जंतर-मंतर येथे कुस्तीपटूंनी 23 एप्रिल रोजी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, आंदोलकांनी कोणतीही परवानगी न घेता 28 मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीकडे मोर्चा काढला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाेचे कारण देत आणि उल्लंघन केल्याचा आरोप करत पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच, त्यांना आंदोलन स्थळावरुनही हटविण्यात आले. या वेळी आंदोलकांसोबत पोलिसांनी केलेले वर्तन अत्यंत मानवताशून्य असल्याचा आरोप झाला. पोलिसांनी आंदोलकांना फरफटत नेल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल जाले होते.

ट्विट

सरकार आणि आंदोलक कुस्तीपटू यांच्यातील पाच दिवसांत झालेली ही बैठकीची दुसरी फेरी आहे. कुस्तीपटूंनी शनिवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या मागण्यांबाबत अवगत केले होते. सरकार आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यास तयार आहे. मात्र भाजपचे खासदार असलेल्या ब्रिजभूषण सिंग यांची अटक हा वादाचा मुद्दा राहिला आहे. आंदोलक ब्रिजभूषण यांच्या अटकेवर ठाम आहेत.