केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर (Union Sports Minister Anurag Thakur) यांनी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. 'आम्ही चर्चेला तयार आहोत', असे म्हणत ठाकूर (Anurag Thakur) यांनी एक प्रकारे केंद्रसरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली. प्रदीर्घ काळ चाललेल्या या भेटीनंतर अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख असलेल्या भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. जे दिल्ली येथे सुरु आहे.
कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे (Sexual Harassment) आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी कुस्तीपटूंची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाकडे केंद्र सरकारने सुरुवातीला दूर्लक्ष केले. मात्र, स्थानिक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही अंदोलनाची दखल घेतली जाऊन दबाव वाढल्यानंतर केंद्र सरकार काहीसे नमते घेत चर्चेची तयारी दाखवत असल्याचे चित्र आहे. अनुरग ठाकूर यांनी मंगळवारी (5 जून) रात्री उशीरा मध्यरात्रीनंतर केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सरकार कुस्तीपटूंशी त्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. मी पुन्हा एकदा कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. (हेही वाचा, Wrestlers' Protest: साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया आंदोलनावर ठाम, न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार)
ट्विट
"The government is willing to have a discussion with the wrestlers on their issues. I have once again invited the wrestlers for the same," tweets Union Minister Anurag Thakur
(File Photo) pic.twitter.com/DX3I1tIaRz
— ANI (@ANI) June 6, 2023
कुस्तीपटूंनी विविध चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेल्या पदकांचे गंगा नदीमध्ये विसर्जन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर काहीच दिवसांनी, कुस्तीपटू आणि त्यांचे प्रशिक्षक यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने 3 जून रोजी गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली, असे सूत्रांनी सांगितले. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी 3 जून रोजी, प्रशिक्षकांसह कुस्तीपटूंनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांना अटक प्रमुख मागणी कुस्तीपटूंनी केली. ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळ आणि धमकीचा आरोप केला आहे.
ट्विट
The government is willing to have a discussion with the wrestlers on their issues.
I have once again invited the wrestlers for the same.
— Anurag Thakur (@ianuragthakur) June 6, 2023
आंदोलक कुस्तीपटू आपली पदके गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला गेले होते. मात्र, तेथे शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी त्यांना रोखले. कुस्तीपटूंची समजूत काढली. त्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना 9 जूनपूर्वी अटक करण्याची मागणी करत सरकारला अल्टिमेटम देऊन हे कुस्तीपटू आपली पदके गंगेत विसर्जीत न करता परत आले.