Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

अयोद्धा नगरी सध्या श्री रामजन्मभूमी मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. श्रीरामाच्या दुमजली मंदिरामध्ये तळभागात गर्भगृहामध्ये रामलल्लांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे तर पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबार असणार आहे. 22 जानेवारी 2024 दिवशी हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होण्यापूर्वी आज श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मध्ये सभासदांकडून रामलल्लांच्या मूर्तीसाठी मतदान होणार असल्यची माहिती सुत्रांनी दिली आहे. 3 मूत्यांपैकी सर्वात आकर्षक मूर्तीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान तिन्ही मूर्त्या तीन वेगवेगळ्या मूर्तीकारांकडून घडवण्यात आल्या आहेत.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे चेअरमॅन चंपत राय यांनी 51 इंच मूर्ती गर्भगृहात विराजमान होईल असं सांगितलं आहे. अंदाजे 5 वर्षाचं हे प्रभू श्रीरामाचं रूप असणार आहे.  Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धा राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला Sachin Tendulkar ते Mukesh Ambani 7000 खास पाहुण्यांना आमंत्रण! 

श्रीराम मंदिर कंस्ट्रक्शन कमिटी चेअरमॅन नृपेंद्र मिश्रा यांनी देखील मंदिर निर्माणस्थळी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी या मंदिराचे काम 3 टप्प्यात होणार असून ते गुणवत्त राखतच पूर्ण होत असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये कोणतीही घाई झालेली नाही. नक्की वाचा: Ayodhya Ram Mandir Aarti Passes: अयोद्धा राम मंदिरात ऑनलाईन, ऑफलाईन आरती पास देण्यास सुरूवात; इथे पहा दर्शन, आरतीच्या वेळा आणि पास कसा मिळवाल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोद्धा नगरीच्या दौर्‍यावर आहेत. 16 जानेवारीपासून मंदिरात विविध विधी आणि पूजा समारंभाला सुरूवात होणार आहे तर 22 जानेवारीला 'मृगशीर्ष नक्षत्रा'वर प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. हा क्षण तमाम हिंदू धर्मीयांसाठी 'याचि देही याचि डोळा' पाहण्यासारखा अनुभव असणार आहे.