Ayodhya Ram Janmabhoomi Mandir Bhumi Pujan: अयोध्या राम जन्मभुमी मंदिराच्या भूमीपूजन व पायाभरणी कार्यक्रमाला आता 24 तासाहुन कमी अवधी शिल्ल्क आहे, उद्या दुपारी 12 वाजुन 15 मिनिटांनी हा भूमीपूजन कार्यक्रम सुरु होईल, पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंच्या हस्ते राम मंंदिराची पहिली वीट रचली जाणार आहे. अयोध्या नगरीत या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. हा सर्व परिसर केशरी रंंगात सजवला आहे. 400 क्विंटल फुलांनी मंंदिर परिसरात सुशोभन करण्यात आले आहे, अनेक भाग पणत्याने उजळुन टाकण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी आमंंत्रित मंंडळी सुद्धा उद्या सकाळपर्यंत अयोध्येत पोहचणार आहेत. वास्त्विक कोरोना नसता तर याही पेक्षा भव्य स्तरावर अनेक मान्यवरांंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला असता मात्र आता कोरोनाचे संंकट लक्षात घेता अवघ्या 200 जणांंच्या उपस्थितीत हे भूमीपूजन होणार आहे. आपणास सुद्धा हा कार्यक्रम पाहायचा असल्यास तो लाईव्ह कुठे आणि कधी पाहता येईल हे आपण जाणुन घेउयात..
अयोध्या राम जन्मभूमी मंंदिराचा भूमीपूजन सोहळा हा जवळपास सर्वच न्युज चॅनेल कव्हर करतील. DD दुरदर्शन वाहिनीवर सुद्धा हा कार्यक्रम दाखवला जाईल. पंतप्रधान कार्यालय (Prime Minister's Office) आणि बीजेपी (BJP) च्या यूट्यूब चॅनेल वर सुद्धा हा सोहळा दाखवला जाईल. PMO आणी BJP ट्विटर अकाउंट वर सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम पाहु शकाल. व्हिडिओज सहित अयोध्या राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाची लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी लेटेस्टली सुद्धा फॉलो करा.
डीडी न्यूजवर इथे पाहा लाईव्ह
Extensive coverage planned by @DDNational and @DDNewslive in the run up to the events in Ayodhya on wednesday, the 5th Aug.
— Prasar Bharati (@prasarbharati) August 2, 2020
दरम्यान,काल मुख्यमंंत्री योगी आदित्यनाथ यांंनी अयोध्येत जाऊन तयारीची पाहणी केली. आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत हे लखनऊ मध्ये पोहचले आहेत. आज संंध्याकाळी ते अयोध्येत दाखल होतील. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, युपी च्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास व मोहन भागवत हे प्रमुख पाहुणे असतील.