Ayodhya Ram Janmabhoomi Mandir Bhumi Pujan Programme: संपूर्ण देश ज्या ऐतिहासिक दिवसाची आतुरतेने वाट पाहात होता तो दिवस आज अखेर उजाडला. अयोध्या रामजन्मभूमि (Ram Janmbhumi) मंदिराच्या भूमिपूजनाच्या आणि पायाभरणी कार्यक्रमाचा अद्भूत सोहळा आज आपल्या सर्वांना अनुभवता येणार आहे. आज दुपारी 12.15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राम मंदिराची पहिली वीट रचली जाणार आहे. पंतप्रधानांसह अनेक दिग्गज राजकारणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली असून आज पहाटेच सॅनिटायजर करुन या परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
राम जन्मभूमि मंदिराच्या भूमिपूजनासाठी सर्व परिसर केशरी रंगात सजवला गेला आहे. आज दुपारी 12.30 वाजता शिलान्यास झाल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. आज सकाळी 8 वाजता भूमिपूजनाचा सोहळा सुरु झाला असून दुपारी 2 पर्यंत हा कार्यक्रम चालेल. भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम दुपारी 12.30 ला सुरु होणार असल्याचा अंदाज आहे. राम मंदिराचे शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दुपारी 12.40 ला पार पडेल. मंदिराचे पुजारी भूमिपूजनाची पूजा सांगतील.
Ayodhya decorated ahead of the foundation stone laying ceremony of #RamMandir today; visuals from Saryu Ghat. pic.twitter.com/S3LPcXVkWF
— ANI UP (@ANINewsUP) August 5, 2020
Ayodhya: Sanitisation being done at Hanuman Garhi temple, ahead of Prime Minister Narendra Modi's visit today. pic.twitter.com/8npqffwKUr
— ANI UP (@ANINewsUP) August 5, 2020
या सोहळ्याचे लाईव्ह प्रेक्षपण DD National आणि DD न्यूज चॅनलवर पाहता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. तर भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे चेअरमन महंत नृत्य गोपाल दास उपस्थित असतील. दरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केंद्र सरकारकडून मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात आली आहे.