Ayodhya Case: सुन्नी वफ्फ बोर्ड जमीन वरचा दावा सोडण्याची शक्यता- मीडिया रिपोर्ट
Babri Masjid (Photo Credits: IANS)

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी आज शेवटच्या सुनावणी पूर्वी मुस्लिम पक्षाकडून याबाबत करण्यात येणाऱ्या मध्यस्थीचे खंडन करण्यात आले आहे. तर सुन्नी वफ्फ बोर्डाने (Sunni Waqf Board) जमीन वरचा दावा सोडण्याची शक्यता असल्याचे मीडिया रिपोर्ट्सकडून समोर येत आहे. मुस्लिम पक्षाकडून इकबाल अंसारी यांचे वकिल एम.आर. शमशाद यांनी एक विधान जाहीर करत असे म्हटले आहे की, सुन्नी वफ्फ बोर्डाने जमिनीवरचा दावा सोडण्याची कोणतेही गोष्ट केली नाही आहे. ही निव्वळ एक अफवाह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टात हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांकडून अंतिम युक्तीवाद करण्यात येणार आहे. त्यामुळे अयोध्या प्रकरणाच्या निकालाची आशा वाढेल. राम जन्मभूमी वादामुळे देशाच्या राजकरणात सुद्धा चढउतार पहायला मिळाले आहेत. मात्र आता बऱ्याच दशकानंतर निर्णय लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर शेवटचा वाद बुधावरी जरी होणार असेल तरीही गुरुवार पर्यंत हे प्रकरण सुरु राहणार आहे. गुरुवारी मोल्डिंग ऑफ रिलिफ वर अधिक चर्चा होणार आहे.(Ayodhya Case: अयोध्या राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता)

सुप्रीम कोर्टात आज हिंदू पक्षाकडून अंतिम युक्तीवाद केला जाईल. त्यानंतर मुस्लिम पक्षाच्या वकिलाल उत्तर देण्यासाठी एका तासाचा अवधी दिला जाणार आहे. तर हिंदू पक्षाचे वकील सीएस. वैद्यनाथन यांना मत मांडण्यासाठी 45 मिनिटे दिली जाणार आहे. त्याचसोबत हिंदू पक्षकारांच्या अन्य वकिलांना सुद्धा तेवढाच वेळ देऊ करण्यात येणार आहे. नंतर मुस्लिम पक्षाचे वकिल राजीव धवन यांना उत्तर देण्यासाठी 1 तासाचा वेळ दिला जाणार आहे. दरम्यान आज या प्रकरणी सुनावणी होणार असल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात 13 ऑक्टोंबर कलम 144 लागू करण्यात आला असून तो 10 डिसेंबर पर्यंत कायम राहणार आहे.