AY 4.2 COVID-19 Variant in India: भारतामध्ये कोरोना वायरसचा नवा व्हेरिएंट 6 राज्यात; यंत्रणा अलर्ट मोड वर
COVID-19 Variant | PC: Pixabay.com

भारतामध्ये एकीकडे कोरोना वायरस संकट (Coronavirus Pandemic) आटोक्यात येत असल्याचं चित्र असताना आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट (COVID-19 Variant) आणि त्यामध्येच दिवाळी आणि सुट्ट्यांचा काळ सुरू झाल्याने पुन्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर आल्या आहेत. जगात काही देशांमध्ये कोरोना वायरसचा नवा व्हेरिएंट AY.4.2 Variantरूग्णसंख्या वाढीचं कारण ठरतोय का? असा प्रश्न असताना भारतामध्येही या व्हेरिएंट मुळे कोविड 19 ची तिसरी लाट येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. सध्या भारतातही काही राज्यांमध्ये AY.4.2 Variant आढळला आहे. पण त्याचं स्वरूप काय? भारातामधील आणि जगातिक स्तरावरील त्याची स्थिती काय? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील तर जाणून घ्या त्याबाबतचे ताजे अपडेट्स.

AY.4.2 हा व्हेरिएंट Delta variant च्या उप वंशातील (Sub-Lineage)आहे. जगात सध्या तो युनाटेड किंग्डम, चीन आणि रशिया मध्येही आढळला आहे. भारतामध्येही तो केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू कश्मीर येथे मागील काही दिवसांत आढळला आहे. ब्रिटिश अथॉरिटीजच्या अंदाजानुसार हा नवा व्हेरिएंट डेल्टापेक्षा अधिक वेगाने संक्रमण करू शकतो पण सध्या त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच यामुळे गंभीर आजाराच्या धोक्याचे किंवा लस कमी प्रभावी होण्याचे देखील पुरावे समोर आलेले नाहीत. नक्की वाचा: COVID-19 New Variant: युके, युएस मध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट AY. 4.2; भारताची वाढली चिंता.

भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचं एक पॅनल सध्या नव्या कोविड 19 व्हेरिएंट वर लक्ष ठेवून आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. AY.4.2 चा शोध घेण्यासाठी विशेष टीम काम करत आहे. ICMR आणि NCDC टीम्सच्या द्वारा विविध व्हेरिएंट वर अभ्यास सुरू आहे.

ANI Tweet

जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील AY.4.2 हा “variant under investigation.” म्हणून सांगण्यात आला आहे. या वायरसला ग्लोबल हेल्थ एजंसी कडून“Nu” variant म्हणून संबोधले जाईल. भारतात नवरात्र, दुर्गापूजेनंतर काहीशी रूग्णसंख्या वाढली आहे पण हे प्रमाण आटोक्यातच राहण्यासाठी दिवाळी सेलिब्रेशनसाठी देखील विशेष गाईडलाईन्स सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.