युके (UK) आणि अमेरिकेत (US) कोविड-19 चा नवा व्हेरिएंट (Covid-19 New Varient) आढळल्याने आता भारतालाही सतर्क राहण्याचे सूचित करण्यात येत आहे. AY. 4.2 असा हा नवा व्हेरिएंट असून हा डेल्टा वेरिएंटपेक्षाही वेगाने पसरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान, या व्हेरिएंटवर युकेमध्ये संशोधन सुरु आहे. (Covid-19 3rd Wave: दिलासादायक! कोरोनाचा कोणताही नवीन व्हेरिएंट दिसला नाही, तिसऱ्या लाटेची शक्यता कमी- तज्ज्ञ)
आतापर्यंत कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या 68,000 हून अधिक नमुन्यांमध्ये हा प्रकार भारतात आढळून आलेला नाही. तरी देखील आम्ही सतर्क राहणार आहोत आणि येत्या काही दिवसांत येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून आणखी नमुने तपासले जातील. त्यामुळे AY 4. 2 मुळे होणारे संभाव्य संक्रमणाकडे लक्ष ठेवता येईल आणि संसर्ग झालेल्यांची त्वरीत ओळख पटेल, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलशी संलग्न वरिष्ठ अधिकारी यांनी दिली. ते INSACOG चे नेतृत्व करत आहेत.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा नवीन उपप्रकार पसरत असल्याचे यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने मागील आठवड्यात जाहीर केले. युएस नंतर आता युके मध्ये कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. 27 सप्टेंबर रोजी समोर आलेल्या डेटानुसार, आठवड्याभरात आढळलेल्या रुग्णांपैकी 6 टक्के रुग्ण हे नव्या व्हेरिएंटने संक्रमित होते. हा नवा व्हेरिएंट वेगाने वाढत आहे. हा व्हेरिएंट मूळ डेल्टा व्हेरिएंट पेक्षा सुमारे 10 टक्के अधिक संसर्गजन्य असू शकतो. तसंच हा व्हेरिएंट युएसमध्ये देखील सापडला आहे.
दरम्यान, हा एक व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे, हे कदाचित चिंतेचे कारण ठरु शकत नाही, हे सीएसआयआर प्रयोगशाळेशी संबंधित एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने दरम्यानच्या काळात स्पष्ट केले आहे. स्ट्रेन जर वेगाने पसरत असेल तर तो अधिक धोकादायक आहे किंवा त्यात अधिक विषाणूजन्य रोग निर्माण करण्यास सक्षम आहे, असेही त्यांना सांगितले.