ATM Card Fraud: एटीएम कार्ड फसवणूक प्रकरणी माजी सैनिकाला दिल्ली पोलिसांकडून अटक
Arrested | (File Image)

नवी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एका माजी सैनिकाला एटीएम कार्ड फसवणूक (ATM Card Fraud) प्रकरणात अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी या व्यक्तीला राजस्थान राज्यातील त्याच्या गावातून अटक केली. विशेष म्हणजे हा व्यक्ती त्याच्या गावात 'रॉबिनहूड' (Robinhood) म्हणून ओळखला जात असे.राजेंद्र कुमार मीणा असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एटीएमकार्डची आदलाबदली करुन लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याच्या गावात तो 'ATM' म्हणूनही ओळखला जात असे.

भारतीय सैन्यात 18 वर्षे सेवा

दिल्ली पोलीस उपायुक्त (केंद्रीय) एम हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कुमार मीणा याने 1 चोरी आणि इतर गुन्हेगारी कारवायांच्या आरोपाखाली बडतर्फ होण्यापूर्वी भारतीय सैन्यात 18 वर्षे सेवा केली होती. मीनाने वापरलेल्या मोडस ऑपरेंडीची माहिती देताना डीसीपी म्हणाले, "तो एटीएम मशिनमध्ये काही उपकरणे बसवत असे आणि किओस्कवर लक्ष्याची वाट पाहत असे. जेव्हा जेव्हा कोणीही ग्राहक पैसे काढण्यासाठी यायचा तेव्हा त्यांचा व्यवहार नाकारला जात असे. नंतर मीना त्यांना व्यवहार पूर्ण होण्याची ऑफर करत असे. मदत करण्याच्या बहाण्याने तो लोकांचे एटीएम कार्ड घेत असे आणि तो तांत्रीक फेरबदल करुन त्यांच्या खात्यावरुन पैसे काढत असे. मीना याला झालेल्या अटकेमुळे हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये घडलेल्या जवळपास 17 प्रकरणे उघडसीस आली आहेत. या प्रकरणात मीणा एकटाच आरोपी आहे की, तो एखाद्या रॅकेटसाठी काम करतो याबाबत पोलीस तपास करत आहेत. (हेही वाचा, Theft: पाकीटात एटीएमचा पिन ठेवणे तीन प्रवाशांना पडले महागात, एकूण 1.38 लाखांचा घातला गंडा)

गरीबांचा रॉबिनहूड

राजेंद्र कुमार मीणा हा राजस्थानमध्ये गरीबांचा 'रॉबिनहूड' म्हणून ओळखला जात असे. तो राजस्थानमधील नीम का थाना जिल्ह्यातील न्योराना गावात राहात असे आणि वंचितांच्या मदतीला धावून जात असे. त्याच्या परोपकारी कामगिरीमुळे लोकांनाही त्याचा संशय येत नसे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत हा बेमालूमपणे आपले कृत्य करत असे. धक्कादायक म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगीतले की, त्याला राजकीय महत्त्वाकांक्षा होत्या. तो आगामी पंचायत निवडणुकीत मीना आपल्या गावातून सरपंचपदासाठी निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. (हेही वाचा, ATM Card बदलून फसवणूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात; एकूण 27 एटीएम कार्ड हस्तगत)

दरम्यान, पोलिसांनी मीणा याला ताब्यात घेतले तेव्हा, त्याच्याकडून 192 एटीएम कार्ड, 24,000 रुपये रोख आणि एक सोन्याचे कानातले जप्त केले. हा सर्व ऐवज तो बेकायदेशीरपणे सोबत बाळगत असे. गफ्फार मार्केटमधील एका खाजगी बँकेत त्यांचे एटीएम कार्ड अनधिकृतपणे बदलल्याबद्दल पीडितेने करोलबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर 5 मे रोजी नोंदवलेल्या एका घटनेमुळे मीणाच्या कृत्याचा तपास सुरू झाला. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मीना याची ओळख पटली. त्यामुळे तातडीने कारवाई करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. डीसीपीने पुष्टी केल्यानुसार मीनाविरुद्ध राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये एकूण 26 एफआयआर नोंदवले गेले आहेत, पुढील तपास सुरू आहे.